करमाळा (अशोक मुरूमकर) : करमाळा नगरपालिकेसाठी निवडणूक जाहीर झाली असून राजकीय वातावरण तापू लागले आहे. गट प्रमुखांकडून उमेदवारांच्या चाचपणीलाही आता वेग आला आहे. जगताप, बागल, देवी व सावंत यांच्यामध्ये कोणता गट कोणाबरोबर येणार यावर बरीच समीकरणे ठरणार आहेत. मात्र १० प्रभागातून काही इच्छुक उमेदवारांच्या नावांची सध्या राजकीय वर्तुळात चर्चा सुरु झाली आहे. युती- आघाडी करायची म्हटले तर कोणत्या प्रभागात कोणता उमेदवार असावा त्याचा प्रभाव किती हे पाहिले जाऊ शकते.
एक नगराध्यक्ष व २० नगरसेवकांसाठी ही निवडणूक जाहीर झाली आहे. नगराध्यक्षपदासाठी ही निवडणूक दुरंगी होणार की बहुरंगी हे पहावे लागणार आहे. नगराध्यक्षपदासाठी कोण कोण उमेदवार असतील याशिवाय नगरसेवकपदासाठी जगताप, बागल, सावंत, देवी, शिंदे यांच्यासह शिंदे व ठाकरे यांची शिवसेना, भाजप यांच्याकडुन कोण उमेदवार असतील याची उत्सुकता लागलेली आहे. १० नोव्हेंबरपासून यासाठी अर्ज दाखल करता येणार आहेत. त्यात काही नावांची चर्चा आहे. मात्र कोण- कोणाबरोबर जाईल हे पहावे लागणार आहे.
नगराध्यक्षपदासाठी जगताप गटाकडून नंदिनी जगताप, संगीता खाटेर, पुष्पा फंड, व स्वाती वीर यांची नावे चर्चेत आहेत. बागल गटाकडून कोमल घुमरे व डॉ. वैशाली घोलप यांचे नाव चर्चेत आहे. याशिवाय सावंत गटाकडून मोहिनी सावंत व देवी गटाकडून सुनीता देवी यांचे नाव चर्चेत आहे.
नगरसेवक पदासाठी ‘या’ नावांची आहे चर्चा
प्रभाग १
शौकत नालबंद, सिकंदर जाधव, राजू आव्हाड, संतोष जाधव, बाबा घोडके, रवींद्र जाधव, समीर तांबोळी, अशपाक जमादार, मुलाणी, राजू सय्यद, दिलीप भुजबळ, सीमा कुंभार आदी.
प्रभाग २
किरण अंधारे, विजू सुपेकर, गणेश कुकडे, संजय सावंत, गोविंद किरवे, अमोल लावंड आदी.
प्रभाग ३
अल्ताफ तांबोळी, संगीता खाटेर, बाळासाहेब इंदुरे, मयूर जोशी, तुकाराम इंदलकर, सचिन गायकवाड, सुनीता देवी, संग्राम माने, अमोल दगडे, बालाजी चांदगुडे आदी.

प्रभाग ४
अतुल फंड, स्वाती फंड, सतीश फंड, दत्ता शिर्के, महादेव फंड, स्वाती माने, हनुमंत फंड, रासकर, सुरेश इंदुरे, भुसारे, चंद्रकांत राखुंडे आदी.
प्रभाग ५
माजी नगराध्यक्ष वैभवराजे जगताप, अमोल परदेशी, अहमद कुरेशी, महंमद कुरेशी, श्रीकांत ढवळे, राहुल जगताप, बागवान, अशोक ढवळे, पंकज परदेशी नाना मोरे, ऍड. शिवराज जगताप आदी.
प्रभाग ६
माजी नगराध्यक्ष प्रशांत ढाळे, रोही आल्हाट, रोहिदास कांबळे, शिवसेनेचे (ठाकरे गट) प्रवीण कटारिया, साधना मंडलिक, मुख्तार पठाण, विक्रम आल्हाट, आदेश कांबळे, भाजपचे शहराध्यक्ष जगदीश अग्रवाल आदी.
प्रभाग ७
ऍड. नवनाथ राखुंडे, अरुणकाका जगताप, शिवसेनेचे जिल्हा प्रमुख महेश चिवटे, निलावती कांबळे, सचिन अब्दुले, एम. डी. कांबळे, चिवटे, अप्पा कांबळे, निलेश कांबळे, सचिन घोलप, जयकुमार कांबळे, रवींद्र कांबळे आदी नावांची चर्चा आहे.
प्रभाग ८
प्रवीण जाधव, सीमा कुंभार, ज्योतीराम ढाणे, महेश पाटुळे, भाजपचे तालुकाध्यक्ष रामा ढाणे, अपसर जाधव, गोरख जाधव, बबन पाटील, विशाल गायकवाड, अभिमन्यू माने, संभाजी माने, संजय घोरपडे, संतोष सापते, भाजपचे दीपक चव्हाण, अभिषेक आव्हाड आदी नावांची चर्चा आहे.
प्रभाग ९
डॉ. अविनाश घोलप, सचिन घोलप, बाळासाहेब बालदोटा, सुहास घोलप, दिनेश घोलप, जयश्री माने, जयंत दळवी आदींची नावे चर्चेत आहेत.
प्रभाग १०
राजू आव्हाड, दादा धाकतोडे, राजश्री माने, मुकुंद कांबळे, रवींद्र कांबळे, अझीम कुरेशी, रणजित कांबळे, सचिन अब्दुले, बाबा घोडके आदी नावांची चर्चा आहे.
