Live सहकार युवक मित्र मंडळाचा ‘सोशल मीडिया शाप की वरदान’ देखावा

करमाळा (सोलापूर) : सहकार युवक मंडळाने ‘सोशल मीडिया शाप की वरदान’ हा सजिव देखावा सादर केला आहे. लोकांना प्रभावित करण्यासाठी सोशल मीडियाचा वापर करु नका तर लोकांवर प्रभाव टाकण्यासाठी त्याचा वापर करा असा संदेश या देखाव्यातून देण्यात आला आहे. तेली गल्ली येथे हे मंडळ आहे उत्कृष्ठ सादरीकरण आणि गंभीर विषय असे या देखाव्याचे वैशिष्ट्य आहे. समाज माध्यमांमुळे भ्रमनिरास होण्याऐवजी मत्सराचे वर्तन निर्माण झाले आहे. दुर्दैवाने काहींना अशा गोष्टींचा नातेसंबंधाचा आणि जीवनशैलिचा हेवा वाटतो ज्या अस्तित्वातही नाहीत. या मंडळाने उत्कृष्ट देखावा सादर केला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *