करमाळा (सोलापूर) : सातारा जिल्ह्यातील अल्पवयीन मुलीला प्रेमसंबंधातून पळवून नेणाऱ्या युवकाला करमाळ्यातील नगर रोड बायपास येथे पकडण्यात आले आहे. सातारा पोलिस संबंधित प्रकरणाचा तपास करत असताना अल्पवयीन मुलगी व संशयित आरोपी यांचा मोबाईल लोकेशन करमाळा तालुक्यातील पोथरे येथील दिसले. त्यानंतर सातारा पोलिसांनी तेथील पोलिस पाटील संदीप शिंदे पाटील यांच्याशी त्वरित संपर्क साधला. दरम्यान संशयित आरोपी व अल्पवयीन मुलगी संबंधित ठिकाणावरून पळून जात होते. त्यानंतर त्यांना शिंदे पाटील यांनी करमाळा बायपास येथे पकडले. त्यानंतर त्यांना करमाळा पोलिस ठाणे येथे दाखल करण्यात आले. पोलिस निरीक्षक ज्योतीराम गुंजवटे यांच्यासमोर हजर करण्यात आले. त्यानंतर सातारा येथील सहायक पोलिस निरीक्षक अभिजित चौधरी यांनी यामध्ये अतिशय गोपनीयता ठेऊन ही कामगिरी केली आहे. मंगळवारी (ता. १८) हा प्रकार घडला आहे.संशयित आरोपी हा जामखेड तालुक्यातील गुरेवाडी येथील असून त्यांचे नाव महेश जगताप असे आहे.
सातारा जिल्ह्यातील अल्पवयीन मुलीला प्रेमसंबंधातून पळवून नेणाऱ्या युवकाला करमाळा बायपासला पकडले
