There will be a help desk at the taluka level and a committee at the village level for Kunbi registration

सोलापूर : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नुकताच कुणबी नोंद तपासणी कामाचा आढावा घेतला. मराठवाड्यातील जिल्हा प्रशासनाकडून ज्या पद्धतीने दाखले वितरित करण्यात आले आहेत. त्या पद्धतीने अन्य जिल्ह्यात कार्यवाही करावी, असे त्यांनी सुचित केले होते. त्यानुसार सोलापूर जिल्ह्यात मराठा समाजाला कुणबी दाखले वितरित करण्यासाठी 12 प्रकारच्या पुराव्याची तपासणी करण्यासाठी तालुकास्तरावर उपविभागीय अधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापित करण्यात आली असून या समितीने पुराव्याची तपासणी करावी, असे आवाहन जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी केले.

जिल्हास्तरावर निवासी उपजिल्हाधिकारी दादासाहेब कांबळे यांच्या अध्यक्षतेखाली समन्वय कक्षाची स्थापना करण्यात आली आहे. तर प्रत्येक तालुक्याच्या ठिकाणी उपविभागीय अधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली तालुकास्तरीय समिती गठीत करण्यात आलेल्या असून संबंधित तहसीलदार हे त्या समितीचे सहअध्यक्ष असतील. या समितीमध्ये गटविकास अधिकारी पंचायत समिती, गटशिक्षणाधिकारी पंचायत समिती, पोलिस निरीक्षक, पोलिस निरीक्षक राज्य उत्पादन शुल्क, उपनिबंधक सहकारी संस्था, उपअधीक्षक भूमी अभिलेख, मुख्याधिकारी नगरपालिका यांचा सदस्य म्हणून समावेश करण्यात आला आहे.

तालुकास्तरीय समितीमध्ये अन्य विभागाचे अधिकारी आवश्यक असल्यास समिती अध्यक्षाने त्यांचा समितीत समावेश करावा. या समितीने तहसील कार्यालयामध्ये मराठा कुणबी पुरावे गोळा करण्यासाठी व दाखला देण्यासाठी तालुकास्तरावर मदत कक्ष स्थापन करावा. या समितीने गाव पातळीवरील अभिलेखाचा शोध घेण्यासाठी गावस्तरीय समितीची नेमणूक करावी, समितीने कुणबी मराठा पुरावे आपले कार्यालयात शोध घेऊन त्याबाबतचे पुरावे व विहित नमुन्यातील अहवाल समिती अध्यक्ष व सहअध्यक्ष यांच्याकडे सादर करावेत. अध्यक्ष व सहअध्यक्ष यांनी कुणबी दाखले वितरण करण्याबाबत शासन नियम व सुधारित शासन निर्णयानुसार पुढील कार्यवाही करावी, अशा सूचना जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी आदेशाद्वारे दिलेल्या आहेत.

मराठा कुणबी प्रमाणपत्र देण्याबाबत शासकीय विभागांनी 1948 पूर्वीचे तसेच 1948 ते 1967 पर्यंतचे विविध शासकीय अभिलेखांची तपासणी करून त्यामध्ये कुणबी नोंदी असलेली कागदपत्रे शोधून काढावीत. जिल्हा परिषद ग्रामपंचायत विभाग, महसूल विभाग, शिक्षण विभाग, राज्य उत्पादन शुल्क, कारागृह अधीक्षक, पोलिस विभाग, रेल्वे विभाग, सहजिल्हा उपनिबंधक, भूमी अभिलेख, जिल्हा सैनिक कल्याण कार्यालय, जिल्हा वक्फ अधिकारी कार्यालय, महापालिका व नगरपालिका या विभागाने उपरोक्त कालावधीतील सर्व अभिलेखांची तपासणी करावी, अशा सूचना निवासी उपजिल्हाधिकारी तथा जिल्हास्तरीय समन्वय समिती कक्षाचे प्रमुख दादासाहेब कांबळे यांनी दिल्या.

प्रत्येक जिल्हास्तरीय व तालुकास्तरीय विभाग प्रमुख व कार्यालय प्रमुखांना शासनाकडून उपलब्ध करून देण्यात आलेले एक ते सहा विवरणपत्र देण्यात आलेले आहेत. त्यानुसार उपरोक्त जुन्या अभिलेखांच्या नोंदी तपासाव्यात असेही कांबळे यांनी सांगितले. तसेच याबाबतचा दैनंदिन अहवाल सादर करावा असेही त्यांनी निर्देशित केले.

By kaysangtaa.21

पुणे, मुंबई, पिंपरी चिंचवड, सोलापूर व नगर येथे ‘पुढारी’, ‘प्रभात’ व ‘सकाळ’मध्ये बातमीदार व उपसंपादक म्हणून काम करत पत्रकारितेचा अनुभव घेतल्यानंतर 'काय सांगता' हे न्यूज पोर्टल सुरु करण्यात आले आहे. या पोर्टलवरील प्रत्येक बातमी विश्वसनीय असते. करमाळा येथील बातम्यांसाठी अशोक मुरूमकर संपर्क : ९९२३१७५०२४ कार्यालय पत्ता : डॉ. बाबासाहेब आंबेडकर शॉपिंग सेंटर, गाळा नं. ४७, पेट्रोल पंपाजवळ, जुनी भाजी मंडई, वरचा मजला करमाळा, जि. सोलापूर- ४१३२०३. मेल आयडी : kaysangtaa.21@gmail.com जाहिरातीसाठी संपर्क : ९९२३१७५०२४

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *