Video : महायुती सरकारमध्ये ‘या’ नेत्यांनी घेतली मंत्रिपदाची शपथ

नागपूर : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारमधील भाजप, शिवसेना (शिंदे गट) व राष्ट्रवादीमधील ३९ नवीन मंत्र्यांनी आज (रविवारी) शपथ घेतली. नागपूर येथे उद्यापासून (सोमवार) हिवाळी अधिवेशन सुरु होत आहे. त्याच्या पूर्वसंध्येला नागपुरातील राजभवन येथे राज्यपाल सी. पी. राधाकृष्ण यांनी या नवीन मंत्र्यांना गोपनीयतेची शपथ दिली. यामध्ये भाजपच्या १९, शिवसेना (शिंदे गट) ११ व राष्ट्रवादीच्या (अजित पवार) नऊ मंत्र्यांनी शपथ घेतली आहे. त्यात ३३ कॅबिनेट व ६ राज्यमंत्री आहेत. या मंत्रिमंडळात नऊ नवीन चेहरे आहेत.

मुख्यमंत्री फडणवीस यांच्यासह उपमुख्यमंत्री अजित पवार, एकनाथ शिंदे यांच्यासह केंद्रीय मंत्री नितीन गडकरी येथे उपस्थित होते. भाजपचे चंद्रशेखर बावनकुळे, पंकजा मुंडे, ऍड. आशिष शेलार, जयकुमार गोरे, अदिती तटकरे, नरहरी झिरवाळ, गुलाबराव पाटील, अतुल सावे, शंभूराज देसाई, चंद्रकांत पाटील, दादा भुसे, संजय राठोड, आशिष जयस्वाल, राधाकृष्ण विखे पाटील, संजय शिरसाट, प्रताप सरनाईक, भारत गोगावले, हसन मुश्रीफ, गिरीश महाजन, गणेश नाईक, मकरंद पाटील, धनंजय मुंडे, उदय सामंत, शिवेंद्रसिंह राजेभोईसले, नितेश राणे, आकाश फुंडकर, बाबासाहेब पाटील, प्रकाश आबिटकर, माधुरी मिसळ, पंकज भोयर, मेघना बोर्डीकर, इंद्रनील नाईक, दत्तात्रय भरणे, योगेश कदम आदींनी शपथ घेतली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *