सोलापूर : यंदा आषाढी यात्रा हायटेक करण्यात येणार आहे. सर्व ठिकाणांचे जिओटॅगींग करा. भाविकांना चांगल्या सुविघा द्या. पालख्यांच्या आगमानापुर्वी सर्व सुविधा तयार ठेवा असे आवाहन सोलापूर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी यांनी केले.
जिल्हा परिषदेने आज सर्व विभागा अंतर्गत भाविकांना द्यावयाच्या सुविघांचा आढावा व्हीसी द्वारे घेतला. सर्व प्रमुख पालखी मार्गावरील मुक्कामाच्या ३४ ग्रामपंचायतीचे ग्रामसेवक व तालुका स्तरीय विभाग प्रमुख यांची आढावा बैठक आज घेणेत आली. या बैठकीस अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संदीप कोहिणकर, प्रशासन व ग्रामपंचायत विभागाचे उप मुख्य कार्यकारी अधिकारी इशाधिन शेळकंदे, पाणी व स्वच्छता विभागाचे उप मुख्य कार्यकारी अधिकारी अमोल जाधव, कार्यकारी अभियंता दिपक कुलकर्णी, कार्यकारी अभियंता खराडे, कार्यकारी अभियंता सुनीस कटकधोंड प्रमुख उपस्थित होते. सिईओ दिलीप स्वामी यांनी आषाढी वारी सनियंत्रण ,अंमलबजावणी,
वारी पूर्वतयारी करणे साठी विविध विभागाचे साजरीकरण करीन घेऊन माहिती जाणून घेतली. पालखी मार्गांवर वारकरी यांचे साठी खाजगी मालकांची शौचालये वापरासाठी सहमती घेऊन त्यावर पांढरे झेंडे लावा. जेणे करून वारकरी त्या ठिकाणी जातील. खाजगी शौचालये वारकरी यांचे साठी सुविधा देणेत येत असलेबाबत सोहळा प्रमुख यांना माहिती ज्या अशा सुचना सिईओ दिलीप स्वमी यांनी दिले.
आरोग्य विभाग विभाग अंतर्गत पालखी मार्गावरील आरोग्य केंद्र निहाय नियुक्त वैद्यकीय अधिकारी व आरोग्य कर्माचारी आदेश देणेत येत आहेत. यात्रा कालावधीत पुरवण्यात येणारा औषध साठा, पालखी मार्गावरील पाणी स्रोत गुणवत्ता अहवाल, वारकरी महिला करीता पुरवण्यात आलेल्या आरोग्य सुविधा या बाबींचा आढावा घेणेत आला.
महिला व बालकल्याण विभाग अंतर्गत महिला वारकर्यांकरिता पुरवण्यात आलेल्या सेवा सुविधा, महिला आयोगाने दिलेल्या सूचनांचे पालन करण्याकरिता केलेले नियोजन याचा आढावा घेतला. सर्व बालविकास प्रकल्प अधिकारी आणि अंगणवाडी पर्यवेक्षिका यांची मुक्काम/विसावा निहाय नियोजन करणेसाठी आदेश देणेत येत आहेत. पालखी मार्गांवर महिला साठी ज्या सुविघा देणेत येत आहेत. या सुविधांची जाणीव जागृती करणे साथी दोन चित्ररथ निर्मिती करणे साठी आदेश देणेत आले आहेत. हिरकणी कक्ष मध्ये महिला हक्क विषयक जाणीव जागृती करीता माहीती पत्रिका तयार करणेत येत आहे.
कृषी विभाग अंतर्गत हरित वारी नियोजन करणेत येत आहेत. वृक्षलागवड करीता खोदण्यात आलेले खड्डे याचा आढावा घेणेत आला. उपलब्ध करण्यात आलेल्या रोपांची संख्या गावनिहाय व त्यांच्या प्रजाती याचा तपशील सिईओ दिलीप स्वामी यांनी जाणून घेतला. पशुसंवर्धन अंतर्गत पालखी मार्गावरील रथाचे घोडे व बैल यांची तपासणी ,लसीकरण ,खाद्यान्न ,ओषधोपचार याची पूर्वतयारी व त्याकरिता नेमण्यात आलेल्या पशुवैद्यकीय अधिकारी यांचे आदेश देणेत आले आहेत. पाणीपुरवठा विभाग अंतर्गत पालखी मार्गावरील एकूण पिण्याच्या पाण्याचे स्रोत व पाणी उपलब्धता अहवाल घेणेत आला. पा भरण्याची ठिकाण व ठिकाण निहाय जबाबदार अधिकारी नियुक्त आदेश, स्नानगृहे व तात्पुरती शौचालय येथील पाणीपुरवठा उपलब्धता ,वीज कनक्षण, मोटार व उंच टाकी यांची उपलब्धता आणि याबाबत नेमण्यात आलेले जबाबदार अधिकारी/कर्माचारी यांचे आदेश, गावांना tcl वाटप तक्ता व ते पूर्ण झाल्याचा अहवाल घेणेत येणार आहे. बांधकाम विभाग अंतर्गत पालखी मार्ग व मुक्काम व विसावा मधील गावांमधील रस्ते दुरुस्ती मंजूर कामे(जिल्हा स्तरावरील व ग्रा प स्तरावरील अनुदान) पालखी मुक्काम व रिगण याठिकाणी मुरुमीकरण करिता मंजूर कामे व सद्यस्थिती जाणून घेणेत आली. स्नानगृहे संख्या उभारणी मंजूर आदेश व सद्यस्थिती सिईओ दिलीप स्वामी यांनी जाणून घेतली. पालखी मुक्काम ठिकाणी महिला वारकर्यांकरिता उभारण्यात येणार मंडप मंजूर आदेश व सद्यस्थिती
स्वछता विभाग अंतर्गत निर्मल वारी राबविणेत येत आहे. पालखी मार्गावरील तात्पुरती शौचालय ठिकाण निहाय संख्या, पाणीपुरवठा स्रोत व पाणी उपलब्धता घेणेत आली. तात्पुरती शौचालय वापर व पर्यवेक्षण करिता पालखी निहाय व गावनिहाय नेमण्यात आलेले जिल्हा ,तालुका स्तरावरील अधिकारी /कर्मचारी आदेश ,नावे ,संपर्क क्रमांक आणि नियुक्त ठिकाण व गावे निश्चित करणेत आली. निर्मल वारी जनजागृती करणे साठी विविध विभागाचे कलापथकाचे नियोजन करणेत येत आहे. निर्मल वारी समारोप नियोजन करणेत आले. ग्रामपंचायत विभाग अंतर्गत ग्रामपंचायत निहाय निर्माण करण्यात आलेले सेवा सुविधा संख्या तक्ता, गावनिहाय संपर्क अधिकारी नेमणूक आदेश, गावनिहाय स्वयंसेवक संख्या, वारी मार्गावर सावली करिता उभारण्यात येणाऱ्या मंडप संख्या व गाव निहाय यादी, प्लास्टिक संकलन केंद्र गावनिहाय संख्या, गावनिहाय सुविधा नकाशे करणे बाबत च्या सुचना उप मुख्य कार्यकारी अधिकारी इशाधिन शेळकंदे यांनी दिल्या.
पालखी गावातून मार्गक्रमण नंतर दुसऱ्या दिवशी करावयाचे स्वछता नियोजन, उपक्रम आणि मनुष्यबळ संख्या व त्याकरिता तालुकास्तरवरून नियुक्त जबाबदार अधिकारी व कर्मचारी यांची नावे व संपर्क क्रमांक एकत्रित करणेचे सुचना अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संदीप कोहिणकर यांनी दिल्या. पालखी तळावर शौचालया साठी वीज, पाणी, तळाची स्वच्छता, वीज कनेक्शन, स्नानासाठी स्नानगृह, टॅंकर मधून थंड पिणेचे पाणी व महिला साठी स्वच्छता सुविघा बाबत उप उप मुख्य कार्यकारी अधिकारी अमोल जाधव यांनी सुचना दिले.