करमाळा (अशोक मुरूमकर) : जिल्ह्यात दिव्यांग व्यक्ती अस्मिता अभियानअंतर्गत करमाळ्यात ५, ६ ते ७ सप्टेंबरला (तीन दिवस) दिव्यांग प्रमाणपत्र शिबिर होणार आहे. करमाळा उपजिल्हा रुग्णालय येथे हे शिबीर होणार आहे, अशी माहिती गटविकास अधिकारी मनोज राऊत यांनी दिली आहे. दिव्यांगांना लाभ देऊन समाजाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी प्रशासन कटिबद्ध असल्याचे राऊत यांनी सांगितले.
या अभियानासाठी पंचायत येथे बैठक झाली. आरोग्य यंत्रणा, पंचायत समिती, तालुका आरोग्य अधिकारी, समाज कल्याणचे अधिकारी, स्वयंसेवी संस्था व मिशन इन्स्टिट्यूट फॉर ट्रेनिंग रिसर्च अँड ॲक्शन(मित्रा) यंत्रणेवर जबाबदारी आहे. हे शिबिर यशस्वी करण्यासाठी सर्व यंत्रणांनी परस्परात समन्वय ठेवून काम करावे, अशा सूचना गटविकास अधिकारी राऊत यांनी दिल्या. जिल्हा शल्य चिकित्सक कार्यालय अंतर्गत येणारे सर्व वैद्यकीय अधिकारी कर्मचारी व जिल्हा आरोग्य अधिकारी यांच्या अंतर्गत येणारे सर्व वैद्यकीय अधिकारी व कर्मचारी हे या शिबिरासाठी विशेष मेहनत घेत आहेत. असेच काम करून दिव्यांग व्यक्तींची योग्य तपासणी करून त्यांना वैश्विक प्रमाणपत्र वेळेत मिळण्यासाठी सर्वांनी दिलेली जबाबदारी चोखपणे पार पाडावी असेही त्यांनी सूचित केले.
करमाळा येथे 1629 दिव्यांग आहेत. त्यातील ८९६ लाभार्त्यांना करमाळा येथे तपासणी करून प्रमाणपत्र दिले जाणार आहे. ६० वर्षपर्यंतच्या लाभार्थ्यांना हे प्रमाणपत्र दिले जाणार आहे. यासाठी ४० डॉक्टरांची टीम असणार आहे. यामध्ये सात प्रकारचे दिव्यंगत्व ग्रह धरले जाणार आहे. शिबीराच्या ठिकाणी ग्रामपंचायतच्या वतीने लाभार्थ्याला आणण्याची सोय केली जाणार आहे.
पहिल्यादिवशी गुरुवारी (ता. ५) : बिटरगाव, कंदर, सांगवी, कविटगाव, पांगरे, शेलगाव व, जेऊर, जेऊरवाडी, झरे, कुंभेज, देवळाली, उमरड, वांगी १, २, ३, ४, खातगाव, डेलवडी, कावळवाडी, कात्रज, पोमलवाडी, केत्तूर, रामवाडी, पोफळज, रिटेवाडी, उंदरगाव, मांजरगाव, सोगाव, गोयेगाव, वाशिंबे, पारेवाडी, भिलारवाडी, भगतवाडी, जिंती, कोंढारचिंचोली, हिंगणी व टाकळी.
दुसऱ्यादिवशी शुक्रवारी (ता. ६) : पहिल्यादिवशी गुरुवारी (ता. ५) : कोर्टी, सावडी, कुंभारगाव, राजुरी, विहाळ, पोन्धवाडी, दिवेगव्हाण, चिखलठाण, कुगाव, केडगाव, पांडे, पोथरे, बोरगाव, दिलमेशवर, घारगाव, पाडळी, पोटेगाव, बाळेवाडी, करंजे, देवीचामाळ, तरटगाव, बिटरगाव श्री, वीट, मोरवड, रोशेवाडी, पिंपळवाडी, अंजनडोह, गुळसडी, साडे, नेर्ले, आवाटी, सालसे, घोटी, आळसुंदे, वरकुटे, पाथुर्डी, निंभोरे व मलवडी.
तिसऱ्यादिवशी शनीवारी (ता. ७) : रावगाव, भोसे, वंजारवाडी, लिंबेवाडी, वडगाव, पुनवर, जातेगाव, खडकी, आळजापूर, कामोणे, मांगी, मिरगव्हाण, अर्जुननगर, हिसरे, हिवरे, कोळगाव, निमगाव, गोंडरे, फिसरे, शेलगाव क, सौन्दे, वरकाटणे, सरपडोह, कोंडेज, केम, सातोली, वडशिवने, कंदर, भाळवणी, ढोकरी, लव्हे, शेटफळ, दहिगाव व करमाळा शहर.