Thri lakhs help to a patient in Kondhez due to MLA Kishor Jorgewar

करमाळा (सोलापूर) : तालुक्यातील कोंढेज येथील केशव आदलिंग यांना उपमुख्यमंत्री राज्यस्तरीय विशेष मदत कक्षमधून तीन लाखाची मदत मिळाली आहे. चंद्रपूरचे आमदार किशोर जोरगेवार यांच्यामार्फत त्यांना उपचारासाठी ही मदत मिळाली आहे.

काही दिवसांपूर्वी त्यांना पुणे येथे उपचारासाठी दाखल केले होते. त्यांच्यावर करण्यात येणाऱ्या उपचाराचा खर्च ७ लाखांच्यावर होता. त्यामुळे त्यांना आर्थिक मदतीची आवश्यकता होती. रुग्णांचे बंधू भैरवनाथ आदलिंग यांनी आमदार किशोर जोरगेवार यांचे स्वीय सहाय्यक गणेश जगताप यांच्याशी संपर्क साधला. त्यानंतर आमदार जोरगेवार यांच्यामार्फत उपमुख्यमंत्री यांच्या ऑफिसमध्ये सहाय्यता निधीसाठी अर्ज केला. त्यामुळे आदलिंग यांना तीन लाख आर्थिक मदत झाली. त्यामुळे त्यांचा मोठा आर्थिक प्रश्न सुटला. त्यांच्यावर डॉक्टरांनी यशस्वी उपचार केले आहेत. सध्या त्यांची प्रकृती ठीक असल्याची माहिती रुग्णांचे नातेवाईक यांनी दिली. आमदार किशोर जोरगेवार यांच्या माध्यमातून आमचे भाऊ केशव यांना उपचारासाठी तीन लाख मदत झाली. याकामी स्वीय सहाय्यक गणेश जगताप यांनी सहकार्य केले.

By kaysangtaa.21

पुणे, मुंबई, पिंपरी चिंचवड, सोलापूर व नगर येथे ‘पुढारी’, ‘प्रभात’ व ‘सकाळ’मध्ये बातमीदार व उपसंपादक म्हणून काम करत पत्रकारितेचा अनुभव घेतल्यानंतर 'काय सांगता' हे न्यूज पोर्टल सुरु करण्यात आले आहे. या पोर्टलवरील प्रत्येक बातमी विश्वसनीय असते. करमाळा येथील बातम्यांसाठी अशोक मुरूमकर संपर्क : ९९२३१७५०२४ कार्यालय पत्ता : डॉ. बाबासाहेब आंबेडकर शॉपिंग सेंटर, गाळा नं. ४७, पेट्रोल पंपाजवळ, जुनी भाजी मंडई, वरचा मजला करमाळा, जि. सोलापूर- ४१३२०३. मेल आयडी : kaysangtaa.21@gmail.com जाहिरातीसाठी संपर्क : ९९२३१७५०२४

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *