करमाळा (सोलापूर) : ‘स्वातंत्र्यपूर्व काळापासून देशसेवेचे बाळकडू स्वातंत्र्यसैनिक माजी आमदार स्व. नामदेवराव जगताप व स्वतंत्रसैनिक माजी आमदार स्व. कर्मवीर अण्णासाहेब जगताप यांच्या रक्तामध्ये होते. स्वातंत्र्यानंतरही जनसेवा करणारे घराणे म्हणजे जगताप घराणे म्हणले तर वावगे ठरणार नाही’, असे मत माजी आमदार जयवंतराव जगताप यांनी व्यक्त केले.
माजी आमदार कर्मवीर अण्णासाहेब जगताप यांच्या जयंतीनिमित्त पुतळ्यास माजी आमदार जगताप यांच्यासह सर्व नगरसेवकांच्या उपस्थितीमध्ये पुष्पहार अर्पण अर्पण करून अभिवादन करण्यात आले. ते म्हणाले, ‘करमाळा तालुक्यात विकास कामाची मुहूर्तमेढच आम्ही रोवली आहे. शिक्षण संस्था, उजनी, मार्केट कमिटी, भाजी मंडई, एसटी डेपो, पोस्ट ऑफिस, कुटीर रुग्णालय, होस्टेल विविध गावाचे पाणीपुरवठा योजना, जेऊर येथील मार्केट कमिटी, संगोबा पाणीपुरवठा योजना, दहिगाव पाणीपुरवठा योजना तसेच लोकप्रतिनिधी म्हणून काम करत असताना तालुक्यातील सर्वांगीण विकासाच्या अनुषंगाने वरिष्ठ पातळीवर मंत्रालयामध्ये विविध विकास कामे पूर्ण केली.’
माजी नगराध्यक्ष वैभवराजे जगताप, नगरसेवक युवराज चिवटे, सचिन अब्दुल्ले, रोहिदास आल्हाट, अहमद कुरैशी, नजीर अहमद कुरेशी, असलम वस्ताद कुरेशी, खाजा उसेन कुरेशी, डॉ. शरद पवार, किरण बोकन, मधुकर भुजबळ, अशपाक जमादार, पंकज परदेशी, जनार्दन नलावडे, अलीम शेख, अशोक नरसाळे, नरेंद्रसिंह ठाकुर, समीर शेख, आनंद जगदाळे, राजू सय्यद, खलील शेख, नागेश राखुंडे, अंगद देवकते, महेश परदेशी, प्रवीण कुटे, केतन इंदुरे, गणेश फलफले, समीर सय्यद, धनाजी जाधव, झुंबर कावळे आदी उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक कर्मवीर अण्णासाहेब जगताप कला क्रीडा मंडळाचे संस्थापक अध्यक्ष ऍड. शिवराज जगताप यांनी केले.
