करमाळा (सोलापूर) : तालुक्यातील सर्वात मोठी असलेल्या केम ग्रामपंचायत निवडणुकीमध्ये दोन्ही गटाकडून प्रचार सुरु झाला आहे. ही निवडणूक चर्चेची ठरणार आहे.
श्री. उत्तरेश्वर युवा परिवर्तन पॅनेलकडून 17 उमेदवार रिंगणात उतरले असून त्यातील 13 उमेदवार हे तरुण आहेत. या पॅनेलमधील 6 उमेदवार हे तळेकर आडनावाचे आहेत.
शिवशंभो पॅनेलमध्ये 5 उमेदवार हे तळेकर आडनावाचे आहेत. केम ग्रामपंचायतची निवडणूक ही श्री उत्तरेश्वर युवा परिवर्तन पॅनल विरुद्ध शिवशंभू पॅनल आशीच आसेल. केमच्या इतिहासातील ही पहिलीच अशी निवडणूक असेल. श्री उत्तरेश्वर युवा परिवर्तन पॅनल मध्ये तळेकर परिवाराचे नेते अच्युत तळेकर पाटील, महावीर तळेकर, महेश तळेकर, सागरराज तळेकर, बापू तळेकर, संदीप तळेकर व शेकडो तळेकर तरुण या परिवर्तन पॅनलमध्ये तळेकर परिवाराचे प्रतिनिधित्व करत आहेत.