करमाळा (सोलापूर) : अरणगाव (ता. जामखेड) येथील हभप रणजित महाराज अरणगावकर यांच्या मार्गदर्शनाखाली हजारो वारकरी उत्तर काशीला पायी गेले आहेत. अक्षयतृतीये दिवशी वारकऱ्यांनी प्रस्थान केले आहे. हे वारकरी पायी गेले आहेत. त्यांच्याबरोबर दोन ट्रॉलीचे १२ ट्रॅक्टर १ जीप आहे. त्यांचा ४५ दिवसांचा प्रवास असून यामध्ये सर्व खर्च हभप रणजित महाराज यांचा आहे, असे हभप बळीराम महाराज वायकर यांनी सांगितले आहे. या दिंडीत हभप लखन महाराज, हभप उध्दव महाराज, हभप तुकाराम महाराज, हभप दादा महाराज, हभप संतोष महाराज, हभप माऊली महाराज, हभप ओम महाराज, हभप कन्हैया महाराज, हभप शशिकांत महाराज, हभप गजानन लकडे महाराज, हभप परमेश्वर भिसे महाराज, हभप किरण डांगरे महाराज हे परिश्रम घेत असून नियोजन करत आहेत.


