जागतिक बालकामगार प्रथा विरोधीदिनानिमित्त विविध उपक्रम

Various activities on the occasion of World Day Against Child Labour

सोलापूर : जागतिक बालकामगार प्रथा विरोधीदिनानिमित्त जिल्ह्यात ३० जूनपर्यंत विविध उपक्रम राबवण्यात येणार असल्याची माहिती सहाय्यक कामगार आयुक्त सुधीर गायकवाड यांनी पत्रकाद्वारे दिली आहे.

पत्रकात म्हटले आहे, सोमवारी (ता 12) जागतिक बालकामगार प्रथा विरोधी दिनाचे औचित्य साधून सहाय्यक कामगार आयुक्त यांच्या कार्यालयामार्फत बालकामगार प्रतिबंध करण्याच्या दृष्टीने जिल्हा कृती दलामार्फत सोलापूर जिल्ह्यात ३० जूनपर्यंत कारखान्यांना भेटी देण्यात येणार आहेत. बालकामगार प्रथा विरोधी सह्याची मोहीम राबवण्यात येणार आहे. पोस्टर चिटकवण्यात येणार आहेत. बालकामगार प्रथा विरोधी जनजागृती करण्यासाठी दलाची स्थापना करण्यात आली असून त्यांच्यामार्फत आस्थापनांची तपासणी करून बालकामगार आढळून आल्यास त्यांची मुक्तता करणे व बालकामगार अधिनियमांतर्गत कार्यवाही करणे तसेच मालक / चालक यांच्याकडून आस्थापनेमध्ये 14 वर्षांखालील बालकामगार काम करीत नाहीत व भविष्यातही काम करणार नाही, असे हमीपत्र संबंधितांकडून घेण्याबाबत सूचना देण्यात आलेल्या आहेत

कोणत्याही कारखाना, आस्थापना, हॉटेल, गॅरेज तसेच धोकादायक उद्योग यामध्ये बालकामगार ठेवणे कायद्यानुसार गुन्हा असून अशा ठिकाणी बालकामगार आढळल्यास त्यांच्यावर योग्य ती कायदेशीर कारवाई करण्यात येईल. तरी कोणत्याही कारखाना, आस्थापना, हॉटेल, गॅरेज तसेच धोकादायक उद्योग यामध्ये बालकामगार ठेऊ नये, असे आवाहन श्री. गायकवाड यांनी केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *