करमाळा (सोलापूर) : महसूल सप्ताहानिमित्त १ ते ७ ऑगस्ट दरम्यान महसूल विभागाच्या वतीने विविध कार्यक्रम होणार आहेत, अशी माहिती तहसिलदार शिल्पा ठोकडे यांनी दिली.

यामध्ये शुक्रवारी (ता. १) आमदार नारायण पाटील यांच्या उपस्थित जिल्हा परिषदेचे माजी सदस्य, पंचायत समितीचे माजी सदस्य, माजी नगरसेवक, सरपंच यांच्यासह सर्व पदाधिकारी यांच्या उपस्थितीत कुर्डुवाडी येथील पंचायत समितीच्या सभागृहात महसूल सप्ताहाचा शुभारंभ होणार आहे. यावेळी महसूल संवर्गातील कार्यरत व सेवानिवृत्त अधिकारी, कर्मचारी यांचा मान्यवरांच्या हस्ते सन्मान करण्यात येणार आहे.

शनिवारी (ता. २) शासकीय जागेवर २०११ पुर्वीपासून रहिवासी प्रयोजनार्थ अतिक्रमण असलेल्या कुटूंबापैकी अतिक्रमण नियमानुकूल करण्यास पात्र असलेल्या कुटूंबांना अतिक्रमीत जागांचे पट्टे वाटप करण्याचा कार्यक्रम होणार आहे. रविवारी (ता. ३) पाणंद व शिव रस्त्यांची मोजणी करुन त्याच्या दुतर्फा झाडे लावली जाणार आहेत. सोमवारी (ता. ४) श्री छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व अभियान मंडलनिहाय राबविण्यात येणार आहे. मंगळवारी (ता. ५) विशेष सहाय्य योजनेतील डीबीटी न झालेल्या लाभार्थ्यांना घरभेटी करुन डीबीटी अनुदानचे वाटप करण्यात येईल. बुधवारी (ता. ६) शासकीय जमिनीवरील अतिक्रमणे निष्काशित करणे व ते अतिक्रमण मुक्त करुन शर्तभंग झालेल्या जमिनीबाबत सरकार धोरणानुसार निर्णय घेतला जाणार आहे.

गुरुवारी (ता. ७) एम. सँड धोरणाची अंमलबजावणी करणे व नवीन मानक कार्यप्रणालीप्रमाणे धोरण पुर्णात्वास नेणे व या कार्यक्रमाने महसूल सप्ताहाची सांगता होईल, असे महसूल प्रशासनाकडून सांगण्यात आले. हे कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी महसूल नायब तहसिलदार विजयकुमार जाधव, निवासी नायब तहसिलदार विजयकुमार लोकरे हे परिश्रम घेत आहेत.सून रहिवासी प्रयोजनार्थ अतिक्रमण असलेल्या कुटूंबापैकी अतिक्रमण नियमानुकूल करण्यास पात्र असलेल्या कुटूंबांना अतिक्रमीत जागांचे पट्टे वाटप करण्याचा कार्यक्रम होणार आहे. रविवारी (ता. ३) पाणंद व शिव रस्त्यांची मोजणी करुन त्याच्या दुतर्फा झाडे लावली जाणार आहेत. सोमवारी (ता. ४) श्री छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व अभियान मंडलनिहाय राबविण्यात येणार आहे. मंगळवारी (ता. ५) विशेष सहाय्य योजनेतील डीबीटी न झालेल्या लाभार्थ्यांना घरभेटी करुन डीबीटी अनुदानचे वाटप करण्यात येईल. बुधवारी (ता. ६) शासकीय जमिनीवरील अतिक्रमणे निष्काशित करणे व ते अतिक्रमण मुक्त करुन शर्तभंग झालेल्या जमिनीबाबत सरकार धोरणानुसार निर्णय घेतला जाणार आहे.

गुरुवारी (ता. ७) एम. सँड धोरणाची अंमलबजावणी करणे व नवीन मानक कार्यप्रणालीप्रमाणे धोरण पुर्णात्वास नेणे व या कार्यक्रमाने महसूल सप्ताहाची सांगता होईल, असे महसूल प्रशासनाकडून सांगण्यात आले. हे कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी महसूल नायब तहसिलदार विजयकुमार जाधव, निवासी नायब तहसिलदार विजयकुमार लोकरे हे परिश्रम घेत आहेत.
