करमाळा (सोलापूर) : वाशिंबे येथील भैरवनाथ तरुण मंडळाच्या वतीने गणेशोत्सवानिमित्त विविध कार्यक्रम आयोजित करण्यात आले. यामध्ये पहीली ते दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी बुद्धिमत्ता विकसित व्हावी म्हणून स्पर्धा परीक्षा घेण्यात आली.
यशस्वी विद्यार्थ्यांना रोख रक्कम, प्रमाणपत्र, स्मृतीचिन्ह देऊन सन्मानित करण्यात येणार आहे. या परीक्षेत शरदचंद्रजी पवार विद्यालय व जिल्हा परिषद प्राथमिक शाळामधील ३७० विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. भैरवनाथ तरुण मंडळातर्फे गणेशोत्सवानिमित्त रक्तदान शिबीर आयोजित करण्यात आले होते. या शिबीरात १११ रक्तदात्यांनी रक्तदान करत सहभाग नोंदवला.
गणेशोत्सवानिमित्त दररोज वेगवेगळ्या प्रकारच्या स्पर्धांचे आयोजन करून विविध सामाजिक उपक्रम राबवत सामाजिक बांधिलकीचा संदेश भैरवनाथ तरुण मंडळाने दिला आहे. कार्यक्रमादरम्यान करमाळा पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्ष विनोद घुगे यांच्या मार्गदर्शनाखालील गणेशोत्सव परिक्षण समितीचे प्रदीप बलदोटा, संदीप पाटील, प्रा. लक्ष्मण राख, अशोक मुरुमकर आदींनी भेट दिली. उद्योगपती बलदोटा यांनी यावेळी विद्यार्थांना पेन भेट दिले.