करमाळा (सोलापूर) : राष्ट्रीय समाज पक्ष व सकल धनगर समाजाच्या वतीने करमाळा येथील के हाईट्स येथे पुण्यश्लोक राजमाता अहिल्याबाई होळकर यांच्या जयंतीनिमित्त विविध कार्यक्रम घेण्यात आले. राजमाता भवन निलेज रोड येथे पाणपोई व वृक्षारोपण करून राजमाता अहिल्याबाई होळकर यांना अभिवादन करण्यात आले.
यावेळी मकाईचे माजी अध्यक्ष दिग्विजय बागल, बाजार समितीचे माजी सभापती प्रा. शिवाजी बंडगर, धुळाभाऊ कोकरे, ऍड. राहुल सावंत, मनसेचे तालुकाध्यक्ष संजय घोलप, शहाजी ठोसर, अतुल फंड, दादा कोकरे, सुहास ओहळ, अरुण शेळके, शहाजी माने, संतोष भांड यांच्या हस्ते वृक्षारोपण व पाणपोईचे उद्घाटन झाले.
याशिवाय मदरशा उर्दू शाळेत अहिल्याबाई होळकर यांची जयंती साजरी करण्यात आली. यावेळी धनगर धर्म पिठाचे जिल्हाध्यक्ष बाळासाहेब टकले, राष्ट्रीय समाज पक्षाचे जिल्हा सरचिटणीस अंगद देवकते, शुभम बंडगर, जिवन होगले, प्रविण होगले, हर्षल कोळेकर, विकास मेरगळ, माजी नगराध्यक्ष प्रशांत ढाळे, माजी नगरसेवक संजय सावंत, जयकुमार कांबळे, ऍड. जमीर शेख, जैनुद्दीन शेख, सिकंदर मुलानी, मुख्याध्यापक कारी काझी सहाब उपस्थित होते.
दहावी, बारावी व गुणवंत यशस्वी विद्यार्थ्यांच्या यावेळी सत्कारही करण्यात आले. नायब तहसिलदार बाबासाहेब गायकवाड, बाजार समितीचे संचालक शंभूराजे जगताप, प्रा. श्रीकांत दरगुडे, राजमाता अभ्यासिकाचे संचालक डॉ. समाधान कोळेकर, प्रदीप वाघमोडे, डॉ. समाधान कोळेकर, तात्या काळे, संतोष भांड, शंकर सुळ,अश्फाक शेख, ईलास घोणे, सुखदेव कोपनर, सोनबा गावडे, विठ्ठल भिसे, अविनाश कुराडे, तानसेन खांडेकर, दीपक कडू, सचिन सामसे, रघुवीर खटके, शरद घरबुडे, विठ्ठल खांडेकर आदी पस्थित होते.