करमाळा (सोलापूर) : कामगार नेते करमाळा हमाल पंचायतचे संस्थापक अध्यक्ष सुभाष आण्णा सावंत यांच्या 11 व्या स्मृतीदिनानिमित्त गुरूवारी (ता. 14) सकाळी 10 ते 12 या वेळेत हभप कबीर अत्तार महाराज यांचे किर्तन होणार आहे. याबरोबर रक्तदान शिबीरही होणार आहे, अशी माहिती हमाल पंचायतचे अध्यक्ष ॲड. राहुल सावंत यांनी दिली आहे. स्व. सुभाष सावंत यांच्या स्मृतिदिनानिमित्त सकाळी 9 वाजता ‘भव्य रक्तदान शिबीर’ सुरु होणार आहे. रक्तदात्याला पाण्याचा जाआर देण्यात येणार आहे. जास्तीत जास्त रक्तदात्यांनी या उपक्रमात सहभागी व्हावे, असे आवाहन करमाळा तालुका हमाल पंचायत, छत्रपती शिवाजी महाराज तरुण मंडळाच्या वतीने करण्यात आले आहे. हा कार्यक्रम सावंत गल्ली, मारुती मंदिर जवळ होणार आहे.
सुभाष सावंत यांच्या स्मृतिदिनानिमित्त गुरूवारी विविध कार्यक्रम
