निंबाळकरांच्या प्रचारासाठी करमाळ्यात ‘व्हिडीओ व्हॅन’! आमदार शिंदेच्या हस्ते प्रचाराची सुरुवात

Video van in Karmala to promote MP Ranjitsinh Naik Nimbalkar Campaign started by MLA Sanjay Shinde

करमाळा (अशोक मुरूमकर) : माढा लोकसभा मतदारसंघासाठी भाजपकडून खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर हे उमेदवार रिंगणात आहेत. भाजपकडून त्यांचा प्रचार सुरु झाला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना तिसऱ्यांदा पंतप्रधान करण्यासाठी निंबाळकर यांना मतदान करण्याचे आवाहन केले जात आहे. महायुतीतील भाजपचे सर्व मित्रपक्ष यासाठी काम करत आहेत. त्यातूनच सरकारने केलेली कामे सर्वसामान्य मतदारांपर्यत पोहोचविता म्हणून व्हिडिओच्या माध्यमातून प्रचार केला जात आहे.

निंबाळकर यांनी शक्तिप्रदर्शन करत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत सोलापुरात उमेदवारी अर्ज दाखल केला. त्यापूर्वीच करमाळ्यात रिक्षाच्या माध्यमातून शहरात प्रचार सुरु झाला होता. आता व्हिडीओ व्हॅनच्या माध्यमातून प्रचार केला जात आहे. आमदार शिंदे यांच्या हस्ते करमाळ्यात विठ्ठल निवास या आमदार शिंदे यांच्या संपर्क कार्यालयासमोर शुक्रवारी (ता. १९) प्रचाराची सुरुवात झाली. यावेळी भाजपचे जिल्हा सरचिटणीस गणेश चिवटे, आमदार संजयमामा शिंदे यांचे समर्थक सुजित बागल, देवळालीचे आशिष गायकवाड, जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष राजेंद्र बारकुंड, जिल्हा परिषदेचे माजी सदस्य उद्धव माळी, गुळसडीचे दत्तात्रय अडसूळ, आळजापूरचे युवराज गपाट, माजी सभापती बापूराव गायकवाड, लिंबेवाडीचे सरपंच किरण फुंदे, भाजपचे तालुकाध्यक्ष रामा ढाणे, शहराध्यक्ष जगदीश अग्रवाल, बिटरगावचे माजी सरपंच डॉ. अभिजित मुरूमकर, वाशिंबेचे उपसरपंच अमोल पवार, नितीन झिंजाडे आदी उपस्थित होते. या गाडीच्या माध्यमातून खासदार निंबाळकरांनी पाच वर्षांत केलेल्या विकास कामांचा लेखाजोखा नागरिकांपर्यंत पोहचवला जाणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *