मुंबई : शिवसेनेच्या (ठाकरे गट) मुंबईतील गोरेगाव विधानसभा मतदारसंघातील शाखा क्रमांक ५८ च्या उपशाखाप्रमुखपदी विजय वाळुंजकर यांची नियुक्ती झाली आहे. शिवसेना नेते आमदार सुनील प्रभू यांनी ही निवड केली असून माजी मंत्री सुभाष देसाई यांच्या हस्ते त्यांना नियुक्ती पत्र देण्यात आले आहे. माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली ते अनेक दिवसांपासून काम करत आहेत. ते अहिल्यानगर जिल्ह्यातील जवळा (ता. जामखेड) येथील मुळचे रहिवाशी आहेत. मात्र कामाच्या शोधात त्यांचे वडील व चुलते मुंबईला गेले होते. त्यानंतर ते तेथीलच स्थायिक झाले आहेत. वाळुंजकर हे एकनिष्ठ शिवसैनिक आहेत. शाखा क्र. ५८ अंतर्गत संघटन वाढवण्यासाठी त्यांच्यावर जबाबदारी देण्यात आली असून त्यांच्या नियुक्तीमुळे उत्साह वाढला आहे. जवळा गावात देखील त्यांच्या नियुक्तीमुळे आनंद व्यक्त केला जात आहे. मुंबई महापालिका निवडणुकीच्या तोंडावर त्यांची नियुक्ती झाल्याने राजकीय चर्चा सुरु झाल्या आहेत.
विजय वाळुंजकर यांची गोरेगाव मतदारसंघात शिवसेना उपशाखाप्रमुख पदी नियुक्ती
