करमाळा (सोलापूर) : तालुक्यातील कुगाव ग्रामपंचायतच्या उपसरपंचपदी बागल गटाच्या विजया गावडे यांची बिनविरोध निवड झाली आहे. शिवसेना (शिंदे गट) नेते व मकाई सहकारी साखर कारखान्याचे माजी अध्यक्ष दिग्विजय बागल, भाजपच्या प्रदेश महिला मोर्चा उपाध्यक्ष राज्य सहकारी साखर संघाच्या संचालिका रश्मी बागल यांच्या नेतृत्वाखाली कुगावच्या प्रगतीसाठी आम्ही निश्चित योगदान देऊ याची ग्वाही गावडे यांनी निवडीनंतर दिली. या निवडीवेळी आदिनाथ सहकारी साखर कारखान्याचे माजी अध्यक्ष धनंजय डोंगरे, सरपंच सुवर्णा पोरे, माजी उपसरपंच प्रकाश डोंगरे, ग्रामपंचायत सदस्य मंगेश बोंद्रे, विजय कोकाटे, अर्जुन अवघडे, संदिपान कामटे, मन्सूर सय्यद, नवनाथ अवघडे, कैलास बोंद्रे, माजी संचालक धुळाभाऊ कोकरे, मार्केट कमिटीचे संचालक महादेव कामटे, माजी उपसरपंच इनुस सय्यद, पोलिस पाटील जालिंदर हराळे, सागर पोरे, सचिन गावडे, ग्रामसेवक श्रीकांत बारकुंड आदी उपस्थित होते.
कुगावच्या उपसरपंचपदी बागल गटाच्या गावडे यांची बिनविरोध निवड
