Village level campaign today and tomorrow for PM Kisan YojanaVillage level campaign today and tomorrow for PM Kisan Yojana

पीएम किसान योजनेअंतर्गत eKYC करण्यासाठी लाभार्थ्यांना आवाहन करण्यात आले आहे. PMKISAN योजनेचे e-KYC पूर्ण केलेली नसल्याने, e-KYC पूर्ण केल्याशिवाय लवकरच मिळणारा पीएम किसान योजनेचा 14 हप्ता व त्यापुढील मिळणारे सर्व हप्ते आपल्याला मिळणार नाहीत.

यासाठी २० व २१ जूनला गाव पातळीवर मोहीम राबविण्यात येत आहे. या दोन दिवसात e-KYC करण्याची शेवटची संधी उपलब्ध करून दिली आहे. तरीदेखील आपण गांभीर्याने न घेतल्यास सदर लाभार्थी शेतकऱ्यांना कायमस्वरूपी अपात्र केल्या जाण्याची शक्यता आहे. प्रधानमंत्री किसान सन्मान योजनेअंतर्गत माहे एप्रिल २०२३ ते जुलै २०२३ या कालावधीतील १४ व्या हप्त्याच्या लाभ वितरणाची कार्यवाही सध्या सुरू आहे. केंद्र शासनाने योजनेच्या १४ व्या हप्त्याच्या लाभासाठी लाभार्थीने ई-केवायसी (e-KYC) व बँक खाते आधार संलग्न (NPCI Seeding) करणे या बाबी अनिवार्य केलेल्या आहेत.

सद्यस्थितीत राज्यात ई-केवायसी करण्यासाठी एकूण १८.२० लाख लाभार्थी तर बँक खाते आधार संलग्न करणेसाठी एकूण १०.४९ लाख लाभार्थी प्रलंबित असल्याने सदरचे लाभार्थी पूर्ततेअभावी १४ व्या हप्त्याच्या लाभापासून वंचित राहतील. राज्यातील ई-केवायसी व बँक खाते आधार संलग्न करणे प्रलंबित लाभार्थीची कार्यपूर्तता करण्यासाठी गाव पातळीवर मोहीम स्वरूपात कार्यवाही करणेबाबत यापूर्वीच निर्देश दिलेले आहेत. तथापी, सदरहू कार्यपुर्ततेची असमानधारक प्रगती पाहता गावपातळीवर राज्यात एकावेळी कँप आयोजन करून युद्धपातळीवर प्रलंबित लाभार्थीचे ई- केवायसी व बँक खाते आधार संलग्न करण्याची कार्यवाही पूर्ण करणे अत्यंत गरजेचे आहे. सदर दोन्ही बाबींमध्ये सरासरी प्रलंबित लाभार्थीची संख्या गाव पातळीवर फार कमी असून या दोन दिवसात या कामी संपूर्ण वेळ दिल्यास १०० टक्के कार्यपूर्तता साध्य करता येईल.

यास्तव, या परिपत्रकान्वये सर्व क्षेत्रीय अधिकारी व कर्मचारी यांना आदेशित करण्यात येते की, प्रलंबित लाभार्थीचे ई-केवायसी (e-KYC) व बँक खाते आधार (NPCI Seeding) संलग्न करण्यासाठी दिनांक २० जून व २१ जून २०२३ रोजी गाव पातळीवर राज्यात सर्वदूर युद्धपातळीवर मोहीम राबविण्यात येत आहे.

तरी कृपया खालील वेगवेगळ्या पद्धतीने आपण दिनांक २० जून व २१ जून २०२३ रोजी PMKISAN योजनेचे e – KYC पूर्ण करून येथून पुढे मिळणाऱ्या सर्व हप्त्यांचा लाभ घेण्याचे आवाहन करण्यात येत आहे

सोबत यादी दिली आहे कृपया आपण यादीप्रमाणे कृती करून तसेच इतर संबंधित लाभार्थ्यांना हा मेसेज व यादी पुढे पाठवावी.
टीप :- यादीतील केवळ ज्या लाभार्थ्यांच्या पुढे NO शेरा दर्शविला आहे त्या लाभार्थ्यानीच प्रत्येक्ष कृती करायची आहे.

1) मोबाईल मधील Chrome किंवा तत्सम अँप मध्ये https://pmkisan.gov.in/ हि वेबसाईट टाकून FARMER CORNER मधील e – KYC पर्यायावर क्लिक करून किंवा डायरेक्ट https://exlink.pmkisan.gov.in/aadharekyc.aspx या लिंकवर क्लिक करून आधार क्रमांक प्रविष्ट करून व आधार नोंदणीकृत मोबाईल वर आलेला OTP टाकून e – KYC पूर्ण करावे.

2) आपण स्वतः आधार कार्ड सोबत बाळगून नजीकच्या कोणत्याही आपले सेवा केंद्र (CSC) / सेतू केंद्र / ऑनलाईन सुविधा केंद्र येथे जावून e – KYC पूर्ण करावे.

3) प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना – Face Authentication द्वारे e- KYC करणे.
https://youtu.be/AUl2UvFSyuM
केंद्र शासनाने अँड्रॉईड मोबाईल वर Face Authentication अँप द्वारे पी.एम. किसान योजनेच्या लाभार्थ्यांना e-KYC प्रमाणिकरण करण्यासाठी नवीन सुविधा उपलब्ध करून दिलेली आहे. या सुविधेच्या माध्यमातून लाभार्थ्यांना स्वत:चे e-KYC प्रमाणिकरण तसेच इतर लाभार्थ्यांचे सुद्धा e-KYC प्रमाणिकरण करता येणार आहे.
सदर App वापरण्याची कार्यपद्धती खालीलप्रमाणे आहे.
१. PMKISAN Gol’ या नावाचे App गुगल प्ले स्टोअर वर उपलब्ध आहे. २. सदरचे App असून सर्वसाधारणपणे सर्व अँड्रॉइड मोबाईलसाठी वापरता येते.
३. या लिंकवर https://play.google.com/store/apps/details?id=com.nic.project.pmkisan क्लिक करून गुगल प्ले स्टोअर मधून मोबाईलवर PMKISAN GoI App Install करून घ्यावे.
४. ज्या लाभार्थ्याच्या अँड्रॉइड मोबाईल मध्ये जुने PMkisan App असेल त्यांनी ते App Uninstall करून पुन्हा PMKISAN GoI 2.00 हे अॅप्लिकेशन Install करावे.
५. त्यानंतर येणाऱ्या स्क्रीन वर इंग्रजी व हिंदी या दोन भाषा निवडण्याचा पर्याय दिलेला आहे त्यापैकी एक पर्याय निवडावा व Submit करावे.
६. समोर दिसणाऱ्या स्क्रीनमध्ये New Farmer Registration आणि Login हे दोन पर्याय दिलेले आहेत. त्यापैकी पी.एम. किसान योजनेतील नोंदणीकृत लाभार्थ्यांनी Login या बटनावर क्लिक करावे.
७. या अॅपच्या वापरासाठी शेतकऱ्यांकडे त्यांचा पी. एम. किसान Registration Id किंवा आधार क्रमांक आवश्यक आहे.
८. स्क्रीनवर दिसणाऱ्या Login Type मध्ये Beneficiary हा पर्याय निवडावा.
९. पी. एम. किसान Registration Id किंवा आधार क्रमांकाच्या आधारे App वर Login करण्यासाठी GET OTP बटनावर क्लिक करावे.
१०. पी. एम. किसान योजनेसाठी रजिस्टर केलेल्या मोबाईल क्रमांकावर चार अंकी OTP प्राप्त होतो, तो OTP टाकून Login करावे.
११. त्यानंतर पुढील स्क्रीनवर स्वतःचा सहा अंकी MPIN तयार करावा. सदर MPIN च्या माध्यमातून लाभार्थ्यास App मध्ये Login करणे तसेच e-KYC करणेसाठी उपयोग होणार आहे.
१२. ज्या Registration Id किंवा आधार क्रमांकावरून App मध्ये Login केले आहे. त्या लाभार्थ्याचे ई-केवायसी प्रमाणीकरण प्रलंबित असेल तर “Your e-KYC is pending for completion” असा संदेश दिसेल. म्हणजेच त्या लाभार्थ्याची e-KYC प्रलंबित आहे.
१३. समोर दिसणा-या Click here to complete your e-KYC या लिंक वर क्लिक केल्यावर लाभार्थ्यांनी तयार केलेला सहा अंकी MPIN प्रविष्ट करावा.
१४. तद्नंतर समोर दिसणाऱ्या Consent Form वर क्लिक करून Scan Face या बटनावर क्लिक करावे.
१५. त्यानंतर समोर FaceRD App is not installed on device असा संदेश दिसल्यास Ok बटनावर क्लिक करावे.
१६. तद्नंतर गुगल प्ले स्टोअर Aadhar FaceRd (Early Access) हे App Install करण्यासाठी उपलब्ध होईल ते Install करावे.
१७. त्यानंतर मोबाईल मध्ये Capturing Face सुरू होईल त्यामध्ये दर्शविलेल्या सूचनांचे पालन करून Proceed या बटणावर क्लिक करावे.
१८. त्यानंतर मोबाईल समोर धरून चेह-यावर प्रकाश दिसेल अशा पद्धतीने Scan Face या बटनावरती क्लिक करावे.
१९. तद्नंतर Images captured successfully processing.. असा संदेश स्क्रिनवर आल्यानंतर Successful e-KYC असा संदेश दिसेल म्हणजेच लाभार्थ्यांचे e-KYC प्रमाणीकरण पूर्ण झाले आहे.
२०. इतर लाभार्थीची e-KYC करवयाची असल्यास Dashboard वरील e-KYC for other beneficiaries’ या बटणावर क्लिक करावे व पुनश्चः वरीलप्रमाणे संपूर्ण प्रक्रिया करावी, असे आवाहन तालुका कृषी अधिकारी संजय वाकडे यांनी केले आहे.

By kaysangtaa.21

पुणे, मुंबई, पिंपरी चिंचवड, सोलापूर व नगर येथे ‘पुढारी’, ‘प्रभात’ व ‘सकाळ’मध्ये बातमीदार व उपसंपादक म्हणून काम करत पत्रकारितेचा अनुभव घेतल्यानंतर 'काय सांगता' हे न्यूज पोर्टल सुरु करण्यात आले आहे. या पोर्टलवरील प्रत्येक बातमी विश्वसनीय असते. करमाळा येथील बातम्यांसाठी अशोक मुरूमकर संपर्क : ९९२३१७५०२४ कार्यालय पत्ता : डॉ. बाबासाहेब आंबेडकर शॉपिंग सेंटर, गाळा नं. ४७, पेट्रोल पंपाजवळ, जुनी भाजी मंडई, वरचा मजला करमाळा, जि. सोलापूर- ४१३२०३. मेल आयडी : kaysangtaa.21@gmail.com जाहिरातीसाठी संपर्क : ९९२३१७५०२४

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *