जागतिक पाणथळ दिनानिमित्त यशकल्याणी नेचर कॉन्झर्वेशन अभ्यासगटाच्या वतीने चंद्रपूर येथील ताडोबा व्याघ्र प्रकपास भेट देत पक्षीनिरीक्षण करण्यात आले. चंद्रपूरातील पाणथळ परीसरात पक्ष्यांसह वन्य जिवांचीही निरीक्षणे यावेळी नोंदविण्यात आली. जागतिक पाणथळ दिवस 2025 ची संकल्पना आहे.

यशकल्याणी संस्थेच्या सहकार्याने प्रा. करे पाटील यांच्या मार्गदर्शनानुसार या पक्षीनिरीक्षण व अभ्यास दौरा झाला. पाणथळ अधिवासांचे महत्व, त्यांची उपयोगिता याबाबत व्यापक स्तरावर जाणिव जागृती होऊन पाणथळींचे संवर्धन होण्यासाठी दरवर्षी जगभरात विविध उपक्रम राबवले जातात. 2 फेब्रुवारीला होत असलेल्या या उपक्रमानिमित्त यशकल्याणी नेचर कॉन्झर्वेशनच्या अभ्यासगटाने चंद्रपुरातील ताडोबा परिसरातील ईराई तलाव परिसरात पॅच बर्डींगनुसार पक्षीनिरीक्षण केले.

यावेळी शॉवलर डक, ओपन बील स्टॉर्क, रीव्हर टर्न, स्टील्ट, ग्रे हेरॉन, कॉमन कूट, व्हाईट ब्रेस्टेड किंगफिशर, आस्प्रे, ट्रीपाय, हनी बझार्ड, जंगल बॅबलर, रेड स्टार्ट अदिसह 15 प्रकारच्या 67 पक्ष्यांची व पाणथळी व ग्रास लँडवर अवलंबून असणारे स्पॉटेड डियर, अँटेलोप, बार्कींग डियर, जंगल बोअर, पट्टेरी वाघ आदि वन्यजीवांचे निरीक्षण नोंदविण्यात आले.

प्रा. बाळकृष्ण लावंड, प्रा. जयेश पवार, प्रा. विष्णू शिंदे, अतुल दाभाडे, बर्डमॅन ऑफ ताडोबाचे सुमेथ वाघमारे यांचेसह पक्षीनिरीक्षक कल्याणराव साळुंके या अभ्यासगटात सहभागी होते. ‘निसर्ग संतुलनात मतत्वाची भूमिका बजावणाऱ्या पक्ष्यांचे व वन्यजीवांचे अधिवास जपले जावेत. त्यासाठी व्यापक जाणिव जागृती करुन निसर्गाप्रति संवेदनशिलता वाढावी यासाठी यशकल्याणी नेचर कॉन्झर्वेशनद्वारे विविध उपक्रम राबवण्याचा मानस आहे’, असे प्रा. करे पाटील म्हणाले.

By kaysangtaa.21

पुणे, मुंबई, पिंपरी चिंचवड, सोलापूर व नगर येथे ‘पुढारी’, ‘प्रभात’ व ‘सकाळ’मध्ये बातमीदार व उपसंपादक म्हणून काम करत पत्रकारितेचा अनुभव घेतल्यानंतर 'काय सांगता' हे न्यूज पोर्टल सुरु करण्यात आले आहे. या पोर्टलवरील प्रत्येक बातमी विश्वसनीय असते. करमाळा येथील बातम्यांसाठी अशोक मुरूमकर संपर्क : ९९२३१७५०२४ कार्यालय पत्ता : डॉ. बाबासाहेब आंबेडकर शॉपिंग सेंटर, गाळा नं. ४७, पेट्रोल पंपाजवळ, जुनी भाजी मंडई, वरचा मजला करमाळा, जि. सोलापूर- ४१३२०३. मेल आयडी : kaysangtaa.21@gmail.com जाहिरातीसाठी संपर्क : ९९२३१७५०२४

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *