करमाळा (सोलापूर) : जेऊर ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत मतदारांचा आपल्याला आशीर्वाद मिळणार असल्याची खात्री माजी आमदार नारायण पाटील यांनी व्यक्त केली आहे. श्री खंडेश्वर ग्रामविकास पॅनलच्या प्रचाराच्या शुभारंभ प्रसंगी ते बोलत होते.
जेऊर येथील ग्रापंचायत निवडणुकीत माजी आमदार नारायण पाटील प्रणित श्री खंडेश्वर ग्रामविकास पॅनलने प्रचाराचा नारळ फोडला आहे. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी श्री. घाडगे होते. यावेळी आनंद नागरी पतसंस्थेचे संस्थापक अध्यक्ष डॉ. सुभाष सुराणा, माजी सभापती अतुल पाटील, राजु पाटील, सोसायटी अध्यक्ष राजाभाऊ जगताप, उपाध्यक्ष महेश कांडेकर, माजी सरपंच सुलेमान मुल्ला, माजी सरपंच भास्कर कांडेकर, माजी सरपंच राजूशेठ गदिया, माजी सरपंच भारत साळवे, माजी उपसरपंच अंगद गोडसे, माजी सदस्य आप्पा मंजुळे,मुबारक शेख, विनोद गरड, संजयकुमार दोशी, बापूसाहेब घाडगे, परमेश्वर पाटील, संतोष वाघमोडे, राजाभाऊ तांबोळी, प्रकाश निमगिरे, शेरखान नदाफ, सुनील कांबळे, हंबीराव चव्हाण, राजु लोंढे, पोपट माने, हनुमंत विटकर, रामदास कोठावळे, रामलाल कोठारी, भारत शिक्षण प्रसारक मंडळाचे सचिव अर्जुनराव सरक, भारत महाविद्यालय प्राचार्य डॉ. अनंत शिंगाडे, प्राचार्य दहिभाते आदी उपस्थित होते. प्रास्तविक राजाभाऊ जगताप यांनी केले तर सूत्रसंचालन माजी ग्रामपंचायत सदस्य विनोद गरड यांनी केले. उपस्थितांचे आभार भारत शिक्षण प्रसारक मंडळाचे सदस्य विलास पाथ्रूडकर यांनी मानले.