करमाळा (अशोक मुरूमकर) : करमाळा नगरपालिका निवडणुकीचे निर्णय अधिकारी दिनेश पारगे यांचा नियोजन शून्य कारभार असल्याचे वास्तव समोर आले आहे. सर्वांशी समानव्य ठेऊन निःपक्षपातीपणे निवडणुका व्हाव्यात म्हणून निवडणूक अयोग्य प्रयत्नशील आहे. मात्र करमाळ्याचे निवडणूक निर्णय अधिकारी त्यांच्याही आदेशाला जुमानत नसल्याचे दिसत आहे. अर्ज दाखल करण्याच्या कक्षाबाहेर काय चालते आहे हे ते कधी येऊन पहातील का? असा प्रश्न करमाळकरांना पडला आहे. पारगे यांच्या कामकाजाबाबत जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला मात्र संपर्क होऊ शकला नाही.
निवडणुका पारदर्शीपणे पार पाडाव्यात म्हणून आदर्श आचारसंहिता जाहीर झाल्यापासून प्रत्येक हालचालीवर निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांचे लक्ष असते. यासाठी हवी तेवढी यंत्रणा व कर्मचारी त्यांच्याकडे असतात. मात्र ते योग्य काम करतात की नाही हे पाहण्याची जबाबदारी त्यांची असते. करमाळ्यात येणाऱ्या वाहनांवर नियंत्रण ठेवण्यासाठी दोन ठिकाणी स्थिर सर्वेक्षण पथक तयार करण्यात आले आहेत. मात्र हे पथक फक्त नावालाच असल्याचे पत्रकारांच्या पाहणीत समोर आले आहे. याची माहिती पारगे यांना मिळत नाही का? ते स्वतः कधी या पथकाची पाहणी करतात का? असा प्रश्न निर्माण होत आहे. पत्रकारांशी ते संवाद साधत नाहीत मग याची माहिती ते का देत नाहीत असा आरोप आहे.
१) करमाळ्यात केत्तूर नाका येथे आज पत्रकारांनी स्थिर सर्वेक्षण पथकाची पहाणी केली. तेव्हा सुरुवातीला तेथे कोण नव्हते. व्हिडीओ शूटिंग सुरु झाल्यानंतर तेथे धावत काही कर्मचारी आले. त्यांच्याकडे चौकशी केली तेव्हा वाहनांची तपासणी केली जात आहे असे सांगितले. मात्र किती वाहनांची चौकशी केली याची पाहणी केली तेव्हा त्यावर फक्त बोटावर मोजण्या एवढ्याची वाहनांची नोंद दिसली. १७ तारखेला उमेदवारी अर्ज दाखल सुरु करण्याची प्रक्रिया सुरु झाली आहे. मग फक्त बोटावर मोजण्याएवढ्या वाहनांची नोंद कशी असा प्रश्न निर्माण होतो आहे. आणि विशेष म्हणजे या पथकाला निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी कधी भेट दिली आहे का? प्रश्न पडतो आहे. दिली असेल तर मग याच्या नोंदी का झाल्या नाहीत. या सर्व कारभारावर संशय येत आहे.
२) दुसरे पथक कमलाभवानी देवीच्या रोडवर आहे. आम्ही तेथे गेलो तेव्हा तपासणी सुरु होती. त्याची माहिती घेतली तेव्हा तेथेही सर्व नोंदी नव्हता. कर्मचाऱ्यांच्या गळ्यात आयडेंटी कार्ड नव्हते. कॅमेरामनच्या गळ्यात आयडीकार्ड नव्हते. ज्यांच्या गळ्यात आयदेकार्ड होते तेही नाव दिसू नये म्हणून शर्टच्या आतमध्ये टाकले होते. आम्ही तेथे होतो तेव्हा फिरत्या सर्वेक्षण पथकाची गाडी आली होती. तेव्हा देखील त्यांच्या गळ्यात शर्टच्या आतमध्ये आयडी असल्याचे दिसले. ती गाडी गेल्यानंतर पुन्हा तपासणी बंद झाली.
३) नगरपालिका कार्यालय परिसरात आम्ही आलो तेव्हा फिरत्या सर्वेक्षण पथकाच्या गाड्या तेथे उभ्या होत्या. मग हे फिरते पथक कसे असा प्रश्न निर्माण होतो आहे. आणि यावर निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांचे लक्ष नाही का? असा प्रश्न निर्माण होतो आहे.
४) पुन्हा आम्ही केत्तूर नाका येथे गेलो तेव्हा तेथे तीन खुर्च्यांवर कर्मचारी वडापाव खाताना दिसेल. तेव्हा एक कॅमेरामन दुसरा कर्मचारी व तिसरा अनोळखी व्यक्ती होता. त्याला घेऊन हे कर्मचारी का बसले होते? हे तपासण्याची जबाबदारी कोणाची आहे? आणि वडापाव खाताना गेलेल्या वाहनात बेकायदा वाहतूक झाली असेल तर ती कशी पकडली जाणार? यावर पारगे उत्तर देतील का? या सर्व कारभाराला पारगे जबाबदार असल्याची चर्चा आहे. त्यांची चौकशी करणे आवश्यक आहे.
निवडणूक निर्णय अधिकारी यांचे निवडणुकीत नियोजन शून्य काम आहे. त्यांच्या नियंत्रणात येथील कोणतीच गोष्ट नसल्याचा आरोप सर्वसामान्य नागरिकांचा आहे. ते थेट गुन्हा दाखल करण्याचीच भाषा वापरत आहेत त्यामुळे नाव देखील आमचे छापू नका असे नागरिक सांगत आहेत. याकडे जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनीच लक्ष देण्याची गरज आहे. (याबाबतचे व्हिडीओ देखील आहेत ते लवकरच समोर येथील)
