Video : पालकमंत्री जयकुमार गोरेंच्या मनात नेमके काय? करमाळा नगरपालिका मिळवण्यासाठी प्लॅन तयार

करमाळा (अशोक मुरूमकर) : करमाळा नगरपालिका निवडणूक जिंकण्यासाठी पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी पूर्ण ताकद लावणार असल्याचे जाहीर केले आहे. ही निवडणूक जिंकण्यासाठी त्यांनी पदाधीकारी आणि उमेदवारांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी अनेक मुद्द्यांवर संवाद साधला.

  • भाजपला मतदान करण्याची भावना मतदारांमध्ये आहे? मात्र आपले तोंड फटकळ असेल तर लोक मतदान कसे करतील?
  • दिग्विजय बागल हे आपल्याबरोबर आहेत. त्यांच्याबरोबर दीड तासाची मॅरेथॉन बैठक झाली. ते देवदर्शनासाठी उजैन येथे गेले आहेत.
  • आपण सर्वजण एकत्र मिळवून काम करू? करमाळ्यात भाजपशीवाय दुसरा कोणताही पक्ष विजयी होऊ शकत नाही हे मी खात्रीने सांगतो. हे वास्तव आहे.
    -आपण सगळ्यांचा अनुभव घेतला आहे. आता सुनीता देवी यांना संधी द्या. घुमरे सरांचा आपल्याला आशीर्वाद आहे.
  • भाजपचा नगराध्यक्ष करण्याची जबाबदारी सरांची आहे. सर्व व्यवस्था तुम्हाला दिली जाईल.
  • साम, दाम, दंड, भेद जे लागेल ते सांगा सर्व बळ दिले जाईल.
  • शंका कोणी कोणावर घेऊ नका, एखादी गोष्ट कानावर आली तर जाहीरपणे बोलू नका. त्याला बोलून गैरसमज दूर करा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *