While working in the revenue department one should be able to read people Additional Director General of Yashda Shekhar Gaikwad

सोलापूर : सरकारच्या विभागापैकी महसूल हा अत्यंत महत्त्वाचा विभाग आहे. या विभागाशी सर्वसामान्य लोकांशी दैनंदिन संबंध येतात. प्रशासकीय स्तरावर महसूल विभाग अत्यंत महत्त्वाची भूमिका बजावत असल्याने सर्व यंत्रणाच्या समन्वयाचे काम येते. त्यामुळे अशा विभागात काम करत असताना माणसे वाचता आली पाहिजेत, कामाचा आनंद घेता आला पाहिजे. जो अधिकारी कर्मचारी हे काम करेल त्याची महसूल विभागातील सेवा उत्कृष्ट असेल, असे प्रतिपादन पुणे येथील यशदाचे अतिरिक्त महासंचालक शेखर गायकवाड यांनी केले.

रंगभवन सभागृह येथे महसूल पंधरवडा सांगता समारोप झाला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी अपर जिल्हाधिकारी मोनिका सिंह होत्या. निवासी उपजिल्हाधिकारी मनीषा कुंभार, महसूल उपजिल्हाधिकारी अमृत नाटेकर, जिल्ह्यातील सर्व उपविभागीय अधिकारी, तहसिलदार, नायब तहसिलदार, मंडल अधिकारी, तलाठी, महसूल सहायक, अव्वल कारकून, शिपाई, वाहनचालक तसेच इतर मान्यवर उपस्थित होते.

सोलापूर जिल्हाधिकारी कार्यालयाच्या वतीने महसूल पंधरवढा सर्व तहसिल कार्यालये, उपविभागीय कार्यालये व जिल्हाधिकारी कार्यालयातील विविध शाखांमध्ये जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांच्या मार्गदर्शनाखाली झाला.

प्रास्ताविक कुंभार यांनी केले. महसूल पंधरवड्यानिमित्त आयोजित स्वच्छ सुंदर कार्यालय या स्पर्धेचे बक्षीस वितरण करण्यात आले. यात मोहोळ तहसिल कार्यालयाला तहसिल स्तरावर, उपविभागीय अधिकारी कार्यालय, माळशिरस, अकलूज यांना उपविभाग स्तरावर तर जिल्हाधिकारी कार्यालयातील महसूल शाखा यांना जिल्हाधिकारी कार्यालय स्तरावरील सर्व शाखांमध्ये प्रथम क्रमांक देण्यात आला.

सर्वोत्कृष्ट अधिकारी व कर्मचारी पुरस्कार
तहसिलदार संवर्गातील सर्वोत्कृष्ट ठरलेले मंगळवेढा तहसिलदार, उपविभागीय अधिकारी, उपविभाग माळशिरस तसेच विविध जिल्हास्तरिय विविध संघटनांचे अध्यक्ष यांनी आपले मनोगत व्यक्त केले. यानंतर सोलापुरच्या अतिरिक्त जिल्हाधिकारी यांनी उपस्थित सर्व कर्मचाऱ्यांना मार्गदर्शन केले व येणाऱ्या प्रत्येक नागरिकांशी सौजन्याने व सकारात्मक दृष्टीकोन ठेवून वर्तन केले पाहिजे अशा मौलिक सूचना दिल्या. महसूल विभागातील कर्मचारी व अधिकारी यांच्या 10 वी व 12 वीतील उत्कृष्ट गुण मिळवलेल्या पाल्यांचा सत्कार सोहळा पार पडला.

रंग महसुली पुस्तकाचे प्रकाशन
शेखर गायकवाड लिखित ‘रंग महसुली’ या महसूल खात्यात काम करताना भेटलेल्या बहुरंगी व्यक्तिमत्व असलेल्या लोकांचे किस्से असलेल्या पुस्तकाचे प्रकाशन अपर जिल्हाधिकारी मोनिका सिंह यांचे हस्ते करण्यात आले. महसुली अधिकारी यांचे समक्ष पुस्तक प्रकाशन करण्याचा शेखर गायकवाड सरांचा मानस होता, ती संधी सोलापूरच्या महसूल विभागाला मिळाल्याचा आनंद सर्वांनी व्यक्त केला.

उपजिल्हाधिकारी तथा भूसंपादन अधिकारी संतोषकुमार देशमुख यांनी आभार व्यक्त केले. व महसूल प्रशासनाने यशस्वी केलेल्या महसुली पंधरवड्यास संपूर्ण जिल्ह्यातून महसूल विभागाचे अधिकारी कर्मचारी तसेच कुटुंबीय मोठ्या संख्येने उपस्थित होते.

By kaysangtaa.21

पुणे, मुंबई, पिंपरी चिंचवड, सोलापूर व नगर येथे ‘पुढारी’, ‘प्रभात’ व ‘सकाळ’मध्ये बातमीदार व उपसंपादक म्हणून काम करत पत्रकारितेचा अनुभव घेतल्यानंतर 'काय सांगता' हे न्यूज पोर्टल सुरु करण्यात आले आहे. या पोर्टलवरील प्रत्येक बातमी विश्वसनीय असते. करमाळा येथील बातम्यांसाठी अशोक मुरूमकर संपर्क : ९९२३१७५०२४ कार्यालय पत्ता : डॉ. बाबासाहेब आंबेडकर शॉपिंग सेंटर, गाळा नं. ४७, पेट्रोल पंपाजवळ, जुनी भाजी मंडई, वरचा मजला करमाळा, जि. सोलापूर- ४१३२०३. मेल आयडी : kaysangtaa.21@gmail.com जाहिरातीसाठी संपर्क : ९९२३१७५०२४

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *