करमाळा (अशोक मुरूमकर) : करमाळा विधानसभा मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी प्रारूप मतदार यादी जाहीर झाली आहे. या यादीत गेल्या पंचवर्षीकच्या तुलनेत यावर्षी मतदान घटले असल्याचे यादीवरून दिसत आहे. याचा फटका कोणाला बसणार हे पहावे लागणार आहे. यादीतील आकडेवारीनुसार मतदान कमी असल्याचे दिसत असले तरी गेल्या निवडणुकीत 3 लाख 23 हजार 96 मतदार होते. आता प्रारूप यादीत 3 लाख 19 हजार 811 मतदार यादीत आहेत.
गेल्या विधानसभा निवडणुकीच्या तुलनेत मतदार यादीमध्ये ३ हजार २८५ मतदार कमी झाल्याचे दिसत आहे. मिळालेल्या माहितीनुसार गेल्या निवडणुकीच्या मतदार यादीमध्ये १७ हजार मतदारांचा मृत्यू झालेला होता. तरीही त्यांची नावे यादीत होती. मात्र आता मृत्यू झालेली नावे कमी करण्यात आली आहेत. १७ हजार मृत्यू झालेली नावे कमी झालेली आहेत. गेल्या निवडणुकीतील यादी व यावर्षीची यादी यामध्ये ३ हजार २८५ मतदार कमी असल्याचे दिसत आहे. ही नावे कमी असली तरी मृत्यू झालेल्या व्यक्तींची १७ हजार नावे कमी यादीतून काडून टाकलेली आहेत.
विधानसभा निवडणुकीसाठी प्रशासनाची जोरदार तयारी सुरु आहे. त्यातूनच प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध झाली आहे. करमाळा विधानसभा निवडणुकीत सध्याच्या परस्थितीत पाटील व शिंदे गटामध्ये प्रमुख लढत होईल असे चित्र आहे. मात्र जगताप गट व बागल गटही या निवडणुकीत उतरणार असल्याची चर्चा आहे. प्रा. रामदास झोळ यांनीही निवडणूक रिंगणात उतरण्याची तयारी सुरु केलेली आहे.
आकडेवारीनुसार मतदार कमी झाल्याचे दिसत असले तरी गेल्यावर्षीच्या यादीतील १७ हजार न होणारी मते कमी झाली आहेत. आताच्या यादीत होणारी मते गृहीत धरली तरी 13 हजार 715 मते वाढली आहेत. याचा फायदा कोणाला होणार हे पहावे लागणार आहे. पुरवणी यादीचेही काम अजून सुरू आहे. प्रसिद्ध झालेल्या मतदार यादीत वयानुसार असलेले मतदान पुढील प्रमाणे…