करमाळा (सोलापूर) : महात्मा गांधी विद्यालयात महिला दिनानिमित्त विविध कार्यक्रम झाले. संस्थेचे विश्वस्त करमाळा तालुका खरेदी- विक्री संघाचे अध्यक्ष शंभूराजे जगताप उपस्थित होते. जगताप यांनी महिला दिनानिमित्त सर्वांना शुभेच्छा दिल्या. ते म्हणाले ‘स्री ही आद्य शक्ती आहे, स्रीचे रूप हे देवीचे रूप आहे. महिलांविषयी आदर सन्मान व्यक्त केला पाहिजे असे ते म्हणाले. कार्यक्रमाला प्रशालेतील शिक्षिका व विद्यार्थिनी उपस्थित होत्या. प्रास्ताविक विनोद कोरडे यांनी तर विद्यार्थिनी प्रतिनिधी कार्तिकी काळे हिने उपस्थितांचे आभार मानले.
महात्मा गांधी विद्यालयात महिला दिनानिमित्त कार्यक्रम
