करमाळा (सोलापूर) : तालुक्यातील निंभोरे, कोंढेज व लव्हेसाठी महत्वाचा असलेल्या विठोबा तलाव भरला असून त्याचे आज (मंगळवारी) जेऊरचे सरपंच पृथ्वीराज पाटील यांच्या हस्ते पाणी पूजन करण्यात आले.
सरपंच पाटील म्हणाले, ‘तीन गावांसाठी अतिशय महत्त्वाचा असलेला हा तलाव जादा प्रमाणात पाझरत होता. यामुळे आमदार नारायण पाटील यांच्या पाठपुराव्यामुळे या तलावाच्या दुरुस्तीसाठी निधी मंजुर झाला. या तलावाच्या दुरुस्ती करण्याचे काम झाले. भविष्यात अनेक वर्ष या तलावातील पाणीसाठा हा अधिककाळ टिकुन राहील व यांचा फायदा शेतकऱ्यांना होईल. मागील आवर्तात या तलावाचे काम सुरु असल्याने पाणी देणे तांत्रिक दृष्ट्या चुकीचे होते. परंतू आता काम पुर्ण झाल्याने पाणी देण्यात आले. भविष्यात या तलावाचा कायमस्वरूपी समावेश केला जाईल, असे पाटील यांनी सांगितले.
यावेळी सोमनाथ ढोले, देविदास भांगे, दादा वळेकर, सतिश वळेकर, दिलीप पाटील, रावसाहेब वळेकर, दिनेश वाघमारे, पोपट फरतडे, गोरख जाधव, भाऊ वाघमारे, नाना जगताप, भिमराव मारकड, अशोक वळेकर, बाळासाहेब वळेकर, अनिल कन्हेरे, पंजाबराव गाडे, दादा पाटील, हरिदास सांगडे, परमेश्वर मारकड, बाळासाहेब मारकड, सचिन वळेकर, अजित वळेकर, गोविंद वाघमारे, ज्ञानदेव वळेकर, धनंजय काळदाते, योगिराज वळेकर, नितीन लांडगे, सुरेश वाघमारे, विठ्ठल वळेकर, धनंजय वळेकर, प्रविण वळेकर, विशाल वाघमारे, विशाल वळेकर, पप्पु वाघमारे, महंमद पठाण, देविदास भांगे, सागर कवडे, उमेश साळुंखे, राजेंद्र वाघमारे, माऊली जाधव, हनुमंत बादल, चंद्रकांत माने, भगवान बादल, रमेश उंबरे, प्रकाश उंबरे, सागर उंबरे, अक्षय उंबरे, दत्ता उंबरे, गणेश उंबरे, सोमनाथ ढोले, देविदास भांगे, दादा वळेकर, सतिश वळेकर, हनुमंत बादल, चंद्रकांत माने, भगवान बादल, रमेश उंबरे, प्रकाश उंबरे, सागर उंबरे, अक्षय उंबरे, दत्ता उंबरे, गणेश उंबरे आदी उपस्थित होते.