करमाळा (सोलापूर) : जेऊर येथील भारत हायस्कूलमध्ये जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय यांच्या वतीने शालेय तालुकास्तरीय कुस्ती स्पर्धा झाल्या. या तालुकास्तरीय कुस्ती स्पर्धेत यशवंतराव चव्हाण महाविद्यालयातील गोरक्ष लोंढे, सचिन बागडे व पुजा पवार या पैलवानांनी यश मिळवले आहे.
लोंढे याने 19 वर्षाखालील मुलांच्या 57 किलो वजनी गटात सहभागी घेतला. भरपूर अटीतटीच्या सामन्यातून त्याने अंतिम फेरीतमध्ये प्रवेश केला. अंतिम सामना जिंकून त्याने तालुक्यात प्रथम क्रमांक मिळवून ज़िल्हा कुस्ती स्पर्धेत स्थान मिळवले. बागडे याने 19 वर्षाखालील मुलांच्या ग्रिको रोमन या प्रकारात 60 किलो वजन गटात सहभागी होऊन अंतिम फेरीत प्रवेश केला. या सामन्यात तालुक्यात प्रथम क्रमांक मिळवून जिल्हास्तरीय स्पर्धेत निवड झाली. तसेच पवार हिने 17 वर्ष वयोगट 53 किलो वजनगटामध्ये तालुक्यात प्रथम क्रमांक मिळवून जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी निवड झालेली आहे.
या यशस्वी खेळाडूंना उपप्राचार्य कॅप्टन संभाजी किर्दाक, क्रीडा शिक्षक प्रा. राम काळे व प्रा. दीपक ठोसर यांनी मार्गदर्शन केले. विद्या विकास मंडळाचे सचिव विलासराव घुमरे, संस्थेचे अध्यक्ष प्राचार्य मिलिंद फंड, सहसचिव विक्रमसिह सुर्यवंशी, महाविद्यालयाचे डॉ. एल. बी. पाटीलयांनी अभिनंदन करून जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या.