करमाळा (सोलापूर) : करमाळा येथील विद्या विकास मंडळाच्या यशवंतराव चव्हाण महाविद्यालयात 2024- 25 या शैक्षणिक वर्षामधील 11 वी कला, वाणिज्य व विज्ञान वर्गातील विद्यार्थ्यांचे आज (मंगळवार) पहिल्या दिवशी स्वागत करण्यात आले. संस्थेचे सचिव विलासराव घुमरे, संस्थेचे अध्यक्ष प्राचार्य मिलिंद फंड यांच्या सूचनेनुसार महाविद्यालयात बारावीच्या विद्यार्थ्यांनी टाळ्या वाजवत गुलाबपुष्प देत स्वागत केले.
महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एल. बी. पाटील, संस्थेचे सहसचिव विक्रमसिंह सुर्यवंशी, कनिष्ठ विभागाचे उपप्राचार्य संभाजी किर्दाक आदी यावेळी उपस्थित होते. प्राचार्य डॉ. पाटील यांनी विद्यार्थ्यांना आतापासूनच आपले ध्येय निश्चित करुन अभ्यास करावा, असे आवाहन केले. महाविद्यालयातील कनिष्ठ विभागातील सर्व प्राध्यापक उपस्थित होते. प्रस्ताविक प्रा. एम. डी. जाधव यांनी केले. तर आभार प्रा. डी. एन. कुंभार यांनी मानले.