करमाळा (सोलापूर) : करमाळा तालुका शैक्षणिकदृष्ट्या समृद्ध करण्याबरोबरच तालुक्यातील शेतकरी आर्थिक दृष्ट्या सक्षम करण्यासाठी दत्तकला शिक्षण संस्थेचे अध्यक्ष प्रा. रामदास झोळ यांनी अपक्ष विधानसभा निवडणूक लढवावी, अशी भावना प्रा. झोळ समर्थकांनी व्यक्त केली आहे.
वाशिंबे येथे एका कार्यक्रमात ही भावना व्यक्त केली आहे. सामाजिक, वैद्यकीय, आर्थिक, सांस्कृतिक क्षेत्रात करमाळा अग्रेसर राहण्यासाठी प्रा. झोळ यांचा चेहरा आशादायक आहे. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी अंकुश झोळ होते. प्रमुख म्हणून दशरथ कांबळे, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हा उपाध्यक्ष रवींद्र गोडगे, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते गणेश मंगवडे, मराठा महासंघाचे सचिन काळे, सुहास काळे, मकाईचे माजी संचालक हरीभाऊ झिंजाडे, राजुरीचे निवृत्ती साखरे, सामाजिक कार्यकर्ते श्रीकांत साखरे, वाशिंबेचे भानुदास टापरे, आबासाहेब मगर, वाशिंबेचे माजी सरपंच भगवानराव डोंबाळे, राजुरीचे सरपंच राजेंद्र भोसले, सोगावचे सरपंच विनोद सरडे, उंदरगावचे सरपंच युवराज मगर, आबासाहेब टापरे होते.
यावेळी करमाळा तालुक्यातील मकाई तसेच इतर साखर कारखान्याचे थकीत बिल शेतकऱ्यांना मिळवून दिल्याबद्दल कृतज्ञता म्हणून दत्तकला शिक्षण संस्थेचे अध्यक्ष प्रा. रामदास झोळ व त्यांच्या पत्नी माया झोळ यांचा सत्कार करण्यात आला.
प्रा. झोळ म्हणाले, आपण विधानसभा निवडणूक लढा म्हणत असाल तर आपल्या आग्रहाखातर यावेळी विधानसभा निवडणुक लढविण्याची तयारी आहे. राजकारण हे चांगल्या माणसांनी करण्याचे काम नाही असे म्हणून समाजातील चांगली सुसंस्कृत अभ्यासु माणसं राजकारणापासून अलिप्त राहिल्यामुळे त्या भागाचा विकास खुंटतो व परत तीच माणसे म्हणतात की चांगल्या माणसाने राजकारणात आले पाहिजे; परंतु बोलून दाखवण्यापेक्षा समाजाच्या कल्याणासाठी चांगल्या माणसांनी पुढे आले पाहिजे तरच खऱ्या अर्थाने विकास होऊन समाजाचे कल्याण होईल. याच भावनेतून आपण करमाळा तालुका विकासाच्या प्रक्रियेपासून वंचित असल्याने या तालुक्याचे परिस्थिती पाहता. आपला तालुका मागास राहिल्यामुळे या तालुक्याचे भवितव्य धोक्यात आहे. राजकारणी मंडळी केवळ राजकारणापुरतं राजकारण करून आपला वैयक्तिक विकास करण्यात दंग आहेत. गटातटाचे राजकारण करून फक्त नागरिकांना विकासाचे नुसते खोटे चित्र दाखवून भुल पाडण्याचे काम केले जात आहे. करमाळा तालुक्यामध्ये व्यवसायिक शिक्षणाची सोय नाही. ते कुठलेही मोठे इंजीनियरिंग, मेकॅनिकल, वैद्यकीय शिक्षणाचे कुठलेही कॉलेज नाही. त्यामुळे येणाऱ्या युवा वर्गा समोर दहावी व बारावी पदवीधर झाल्यानंतर रोजी रोटीसाठी परगावी जाण्याशिवाय पर्याय नाही. करमाळा तालुक्यात आरोग्य दृष्ट्या मागासपासून एवढा मोठा तालुका असताना तालुक्यातील एकही मल्टी स्पेशलिटी हॉस्पिटल नाही. आरोग्य सुविधाच्या अभावमुळे नागरिकांचे मोठ्या प्रमाणात हाल होत आहेत. बाहेरगावी जावे लागत असल्याने आर्थिक हानी बरोबरच जीवित हानी होण्याचे शक्यता वाढते आहे.
उजनी धरणामुळे येथील शेतकरी काही प्रमाणात उसामुळे सधन झाला असला तरी शेतकरी च्या ऊसाला एक तर सध्या परिस्थितीत राजकारण राजकीय हस्तक्षेपामुळे भाव मिळत नाही भाव मिळाला तर बिल लवकर मिळत नाही. अशी परिस्थिती इथल्या शेतकऱ्याची झाली असून शेतकऱ्याचा वाली कोणी उरला नाही. त्यामुळेच करमाळा तालुक्याचा सर्वांगीण विकास करण्यासाठी करमाळा तालुक्याचा भूमिपुत्र या नात्याने तालुक्यातील समस्या बघून या समस्या सोडवण्यासाठी आज आपण राजकीय भूमिका घेतली नाही तर आपला तालुका आणखी मागे जाईल आणि भविष्यामध्ये आपण करमाळा तालुक्यासाठी काही नाही केले याचा पश्चाताप होईल अशी भावना माझ्या मनात निर्माण झाल्याने मी करमाळा तालुक्यासाठी राजकीय भूमिका घेऊन काम करण्याची ठरवले आहे . सर्वसामान्य जनतेच्या पाठबळावर आपण ही निवडणूक लढवणार असल्याचे दत्तकला प्राध्यापक रामदास झोळ यांनी सांगितले आहे.
तालुक्यातील रिटेवाडी उपसा सिंचन योजनेच्या आंदोलनात सहभागी होऊन त्याचाही पाठपुरावा करण्याचा प्रयत्न केला आहे. मराठा समाजासाठी मनोज जरांगे पाटील यांच्या आरक्षणाच्या आंदोलनाला पाठिंबा देत असताना मराठा समाजाच्या विविध अडचणी सोडवण्याचा प्रामाणिक प्रयत्न केल्याचं आवर्जून सरांनी सांगितले मराठा समाजाबरोबरच इतर ओबीसी आणि वंचित समाजातील विद्यार्थ्यांना शैक्षणिक सवलती मिळवून देण्यासाठी सरकार दरबारी लढा देऊन प्रत्येकवेळी वंचित आणि ओबीसी समाजातील विद्यार्थ्यांना देखील सहकार्य करण्याची भूमिका घेतल्याची भावना या कार्यक्रमाच्या निमित्ताने त्यांनी बोलून दाखवली.
तालुक्यातील विद्यार्थ्यांना व्यावसायिक शिक्षण मिळावं या उद्देशाने करमाळा शहराच्या नजीक असणाऱ्या देवळालीमध्ये लवकरच मोठ शिक्षण संकुल उभा करण्याचा मानस देखील या निमित्ताने सरांनी बोलून दाखवला आहे.
करमाळा तालुक्यातील शेतकऱ्यांच्या बाजूनं प्रमाणिक भूमिका घेणारा, सर्वसामान्य जनतेला आपला माणूस वाटणारा नेता म्हणून आपण झोळ सरांना पाहत आलेलो मकाई ,ञआदिनाथ कारखान्यामध्ये ऊस बिलाच्या संदर्भातील आंदोलनाच्या माध्यमातून सरांनी शेतकऱ्यांसाठी जो यशस्वी लढा दिला यासाठी शेतकरी संघटनेच्या वतीने, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हा उपाध्यक्ष श्री रवी भाऊ गोडगे तसेच स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते गणेश जी मंगवडे यांनी झोळ सरांना पाठिंबा जाहीर केला. करमाळा तालुकयाचा खऱ्या अर्थाने विकास करायचा असेल तर अभ्यासू सुसंस्कृत सुशिक्षित नेतृत्वाची या तालुक्याला गरज असून भूमिपुत्र असणारे दुसऱ्या जिल्ह्यामध्ये शैक्षणिक संकुल उभा करून हजारो विद्यार्थ्यांना शिक्षण देऊन त्यांचे जीवन समृद्ध करणारे प्राध्यापक रामदास झोळ सर हे खऱ्या अर्थाने करमाळा तालुक्याचा विकास करून शकतात हे पटल्याने आपण यांना पाठिंबा दिला आहे त्यामुळे आता गटातटायच्या राजकारणाला व कुणाच्याही भूलथापांना बळी न पडता एक वेळ प्राध्यापक रामदास झोळसर यांना आमदार पदी निवडून देऊन काम करण्याची संधी द्यावी दिलेल्या संधीचे नक्कीच ते सोने करून सर्वसामान्य जनता शेतकरी वंचित युवक कामगार महिला या सर्वांचे प्रश्न नक्कीच मार्गी लावतील, असा विश्वास शेतकरी कामगार संघर्ष समितीचे अध्यक्ष दशरथ कांबळे यांनी व्यक्त केले.
अधक्ष्यीय भाषणात बोलताना अंकुश दादा झोळ म्हणाले झोळ सर आमचे भाऊ आहेत,शिक्षण हे वाघिणीचे दूध आहे त्याने लोकांच्या विचारात प्रगल्भता येते. तालुक्यातील वाशिंबे गावचा युवक शैक्षणिक ,आरोग्यविषयक बाबी,युवकांच्या रोजगाराच्या बाबतीत, शेतकऱ्यांच्या प्रति अतिशय तळमळीने काम करताना आम्ही पाहत आहोत याचा आम्हाला अभिमान आहे म्हणूनच वाशिंबे गावातील सर्व स्थरातील युवक,युवती,शेतकरी वर्ग मोठ्या प्रमाणात सरांच्या पाठीमागे भक्कमपणे उभा राहणार आहोत.
या कार्यक्रमाचे स्वागत कार्यक्रमाचे संयोजन तसेच सूत्रसंचालन श्रीकांत साखरे यांनी केले. तर आभार अनुरथ झोळ यांनी मानले.
रामदास झोळ, संतोष वाळुंजकर, धनंजय जगदाळे, दिलीप जगदाळे, विष्णू वाघमोडे, राजेंद्र वाघमोडे, महादेव भोईटे, गफूर शेख, गुलाब पवार, सतीश शिंदे, शंकर कांबळे, दुर्योधन गायकवाड, समाधान गायकवाड, दत्तात्रय कुलकर्णी, तात्या कळसाईत, सोमनाथ चव्हाण, रोहित बारहाते, बाळू शिंदे, महावीर ओस्तवाल, शुभम झोळ, लालासाहेब जाधव, गोरख झोळ, पांडुरंग झोळ, गणेश जाधव, राहुल पाटील, रेवणनाथ बोबडे, पप्पू टापरे, अजित जगताप, राघू निकत, विजय निकत, युवराज खाटमोडे, अभिजित खाटमोडे भाऊ बागल, तुकाराम खाटमोडे, दादा तांबे,तानाजी काका देशमुख, आप्पासाहेब जाधव, प्रकाश गिरंजे, प्रवीण बाबर, पै.राजू जाधव, सचिन गायकवाड आदी उपस्थित होते.