करमाळा (सोलापूर) : कोर्टी येथील छत्रपती शिवाजी विद्यालय येथे तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शन झाले. यामध्ये झरे येथील नामदेवराव जगताप विद्यालयाचा विद्यार्थी अभिजीत राऊत ९ वी ते १२ च्या गटात तालुक्यात प्रथम आला आहे. त्याची जिल्हास्तरीय प्रदर्शनासाठी निवड झाली आहे. त्याने प्रदर्शनात स्वयंचलित सिंचन पद्धती व पाण्याचा निचरा करणारी प्रभावी पध्दती यामध्ये संशोधन करुन प्रयोग सादर केला. त्यांच्या या संशोधनाची जिल्ह्यासाठी निवड झाली आहे. या यशाबद्दल त्याचे गटशिक्षणाधिकारी जयवंत नलवडे, संस्था अध्यक्ष बन्सी घाडगे यांनी अभिनंदन केले. या प्रयोगासाठी विज्ञान शिक्षिका वैशाली राजमाने व धनंजय चव्हाण यांचे मार्गदर्शन मिळाले.
तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शनात झरे विद्यालयाचा विद्यार्थी प्रथम
