करमाळा : करमाळा कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये आज उडीदाला १० हजार ७१ रुपयांचा उचांकी दर मिळाला आहे. तालुक्यात पाऊस कमी झाल्याने उडीदाची आवक घटली असून आज (मंगळवारी) १२० क्विंटलची आवक झाली आहे.

करमाळा कृषी उत्पन्न बाजार समीतीमध्ये उडीदाची आवक सुरु झाली आहे. सुरुवातीला तालुक्यात झालेल्या पावसामुळे शेतकर्यांनी उडीदाची पेरणी केली होती. मात्र पुढे पाऊस न आल्याने अनेकांनी उडीद मोडले. ज्यांचे उडीद चांगले होते, त्या शेतकर्यांनी बाजारात विक्रीसाठी आणायला सुरुवात केली आहे. आज १२० क्विंटल उडीदाची आवक झाली असून १० हजार ७१ रुपये असा उचांकी दर मिळाला असल्याचे बाजार समितीचे सचिव विठ्ठल क्षिरसागर यांनी सांगितले आहे.