मुंबई : राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्या उपस्थितीत यशवंतराव चव्हाण सेंटर येथे शरद पवार गटाचे आमदार, खासदार व पदाधिकारी यांची बैठक सुरु आहे. या बैठकीला १६ आमदार उपस्थित असल्याची माहिती मिळत आहे. जयंत पाटील, जितेंद्र आव्हाड, मकरंद पाटील, राहुल भुसार, प्राजक्त तनपुरे, रोहित पवार, बाळासाहेब पाटील, चेतन तुपे, क्षीरसागार आदी उपस्थित आहेत. (उपस्थित आमदारांची संख्या वाढू शकते. बैठक अजून सुरु आहे.)
