केम येथून २३ वर्षाचा मुलगा बेपत्ता झाला आहे. याची नोंद करमाळा पोलिस ठाण्यात झाली आहे. स्वप्निल तानाजी तळेकर असे बेपत्ता झालेल्या मुलाचे नाव आहे. संबंधित मुलगा बेपत्ता झाल्यानंतर नातेवाईकांनी त्याचा शोध घेतला मात्र सापडला नाही. त्यानंतर त्यांनी पोलिसात तक्रार दिली. त्यावरून हरवले असल्याची नोंद झाली आहे. याचा तपास सुरु असल्याची माहिती करमाळा पोलिसांनी आज सोमवारी पत्रकारांना दिली आहे.
केम येथून २३ वर्षाचा मुलगा बेपत्ता; करमाळा पोलिसात नोंद
