करमाळा (सोलापूर) : मकाई सहकारी कारखाना हा सभासदांच्या मालकीचा आहे. आम्ही फक्त विश्वस्त या नात्याने भूमिका बजावत आहोत. सर्वांच्या सहकार्याने निश्चितपणे काही काळात हा कारखाना पुनर्वैभव प्राप्त करेल, असा विश्वास भाजप महिला मोर्चाच्या प्रदेश उपाध्यक्षा साखर संघाच्या संचालिका रश्मी बागल यांनी येथे व्यक्त केला.
श्री. मकाई सहकारी साखर कारखान्याची 25 वी वार्षिक सर्वसाधारण सभा झाली. कारखान्याचे संस्थापक राज्याचे माजी मंत्री लोकनेते स्व. दिगंबरराव बागल मामा यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचे पूजन आदिनाथचे उपाध्यक्ष केरू गव्हाणे यांच्या हस्ते झाले. ‘माजी मंत्री लोकनेते दिगंबरराव बागल मामा यांनी मकाईच्या रूपाने एक वारसा परंपरा आपणा सर्वांचे हातात जतन करण्यासाठी दिला आहे’, असे रश्मी बागल म्हणाल्या. पुढे बोलताना त्या म्हणाल्या, ‘मकाईचे संरक्षण व संवर्धन ही आमची जबाबदारी आहे. सर्वांच्या सहकार्याने निश्चितपणे येत्या काही काळात मकाई पुनर्वैभव प्राप्त करेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
‘मकाईकडे कोणी राजकारणाच्या दृष्टीने मुद्दामहून टीका करून बदनाम करत असेल तर हे यापुढील काळात सहन केली जाणार नाही. त्याला जशास तसे उत्तर दिले जाईल,’ असा इशारा भाजपच्या बागल यांनी दिला आहे. मकाईच्या प्रगतीसाठी आम्ही प्रॉपर्टी गहाण ठेवली आहे. ही संस्था आम्ही प्रामाणिकपणे चालवण्याचा प्रयत्न करत आहोत, असेही त्या म्हणाल्या. मकाईमध्ये कोणी राजकारण आणत असेल तर ते सहन केले जाणार नाही, असाही इशारा त्यांनी दिला.
कारखान्याचे अध्यक्ष दिनेश भांडवलकर, संचालक कल्याण सरडे, शेखर जोगळेकर, कार्यालईन अधिक्षक लहू बनसोडे, संचालक बाळासाहेब पांढरे, आदिनाथचे माजी अध्यक्ष धनंजय डोंगरे, संचालक सतीश निळ, युवराज रोकडे, रेवननाथ निकत, गणेश झोळ, अजित झांजुर्णे, ऍड. जयदीप देवकर, अशोक बाप्पा पाटील, गणेश तळेकर, महेश तळेकर, बापू चोरमले, अनिल अनारसे, विलास काटे, अनिल शिंदे, रामचंद्र हाके, दिनकरराव सरडे, गोवर्धन करगळ, नवनाथ बागल, राजेंद्र मोहोळकर, आशिष गायकवाड, अमोल यादव, सचिन पिसाळ, संतोष पाटील, नंदू भोसले, प्रकाश पाटील, बापू कदम, विष्णू माने आदी उपस्थित होते. मकाईचे माजी अध्यक्ष दिग्विजय बागल यांची जिल्हा नियोजन समितीच्या सदस्यपदी नियुक्ती झाल्याबद्दल त्यांच्या अभिनंदनाचा विशेष ठराव यावेळी करण्यात आला. पोथरे येथील हरिश्चंद्र झिंजाडे यांनी त्याला अनुमोदन दिले.