Rokdi siblings at Chikhalthan have a gold medal in Bhopal

करमाळा (सोलापूर) : तालुक्यातील चिखलठाण येथील निकिता रोकडे व श्रेयस रोकडे या बहिण भावंडानी भोपाळ (मध्य प्रदेश) येथील शालेय राष्ट्रीय शूटिंग स्पर्धेत सुवर्णपदक मिळवले आहे. त्याबद्दल त्यांचा ग्रामस्थांच्या वतीने सत्कार करण्यात आला. २६ डिसेंबर १ जानेवारी दरम्यान या स्पर्धा झाल्या. त्यात रोकडे बहिण भावंडाची निवड झाली होती.

जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष राजेंद्र बारकुंड यांच्या नेतृत्वाखाली हा सत्कार झाला. यावेळी आदिनाथचे माजी संचालक संदीपान बारकुंड, सरपंच धनश्री गलांडे, उपसरपंच आबासाहेब मारकड, मुख्याध्यापक श्री. वायदंडे, गोटू पवार, ग्रामपंचायत सदस्य आनंद पोळ, राजेंद्र चव्हाण, सौ. चव्हाण, चंद्रकांत सुरवसे, साहेबराव मारकड, मारुती गायकवाड, पोलिस पाटील दिलीप दुबळे, बाळासाहेब गव्हाणे, सर्जेराव मारकड, सतीश बनसुडे, पप्पू गव्हाणे, संतोष सरडे, अमोल रोकडे, रंगनाथ रोकडे, सुदाम चव्हाण, किसन पवार, विवेक जानभरे, सतीश तरंगे आदी उपस्थित होते.

By kaysangtaa.21

पुणे, मुंबई, पिंपरी चिंचवड, सोलापूर व नगर येथे ‘पुढारी’, ‘प्रभात’ व ‘सकाळ’मध्ये बातमीदार व उपसंपादक म्हणून काम करत पत्रकारितेचा अनुभव घेतल्यानंतर 'काय सांगता' हे न्यूज पोर्टल सुरु करण्यात आले आहे. या पोर्टलवरील प्रत्येक बातमी विश्वसनीय असते. करमाळा येथील बातम्यांसाठी अशोक मुरूमकर संपर्क : ९९२३१७५०२४ कार्यालय पत्ता : डॉ. बाबासाहेब आंबेडकर शॉपिंग सेंटर, गाळा नं. ४७, पेट्रोल पंपाजवळ, जुनी भाजी मंडई, वरचा मजला करमाळा, जि. सोलापूर- ४१३२०३. मेल आयडी : kaysangtaa.21@gmail.com जाहिरातीसाठी संपर्क : ९९२३१७५०२४

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *