करमाळा (सोलापूर) : मानव एकता दिनानिमित्त संत निरंकारी चॅरिटेबल फाऊंडेशन दिल्ली शाखा करमाळाच्या वतीने आयोजित रक्तदान शिबीरात २६० जणांनी रक्तदान केले. संत निरंकारी मंडळाचे सोलापूर झोनचे ज्ञानप्रचारक चाँदभाई तांबोळी महाराज, माजी नगराध्यक्ष वैभवराजे जगताप, मकाई साखर कारखान्याचे माजी अध्यक्ष दिग्विजय बागल, राष्ट्रवादीचे (अजित पवार गट) जिल्हापाध्यक्ष अशपाक जमादार, जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष राजेंद्र बारकुंड, पंचायत समिती शिक्षण विभागाच्या शिक्षण विस्तार अधिकारी प्रभावती जगताप, सरपंच रविंद्र वळेकर आदी उपस्थित होते.
यावेळी ज्ञान प्रचारक चाँदभाई तांबोळी महाराज यांनी संत निरंकारी मंडळाच्या आध्यात्मिक व सामाजिक समाजोपयोगी मानवतावादी कार्याची माहिती दिली. या शिबीरात रक्तसंकलनाचे काम बार्शी येथील श्रीमान रामभाई शहा रक्तपेढी, सोलापूर येथील सिव्हिल हॉस्पिटल, श्रीम. गोपाबाई दमाणी ब्लड बँक यांनी केले. रक्तदात्यांचा सन्मान पुस्तक व रोप देवून करण्यात आला.
कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सेवादल अधिकारी रमेश वारे, भैरू वळेकर, वैशाली सरडे, मुकुंद साळूंके, अंगद पडवळे, बप्पा धडस, एकनाथ निमगीरे, मोहन चोरमले, मनधीर शिंदे, सुनील भोगे यांनी परिश्रम घेतले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सुनिल शिंदे यांनी केले तर सर्व रक्तदात्यांचे मान्यवरांचे व रक्तपेढीच्या सर्व डॉक्टरांचे आभार करमाळा ब्रँच मुखी पोपट थोरात यांनी मानले.