In Balewadi the three have created role models for the youth

करमाळा (सोलापूर) : तालुक्यातील बाळेवाडी येथे एकाचवेळी तिघाजणांची शासकीय सेवेत निवड झाली आहे. त्यामुळे तिघांसह त्यांच्या आई- वडिलांचा गावकऱ्यांकडून सत्कार करण्यात आला. राम नलवडे यांची महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या वतीने घेण्यात आलेल्या परीक्षेतून STI पदावर नियुक्ती झाली आहे.

अविनाश नलवडे यांची नाशिक येथे तलाठी म्हणून तर निलेश नलवडे यांचीही सोलापूर येथे तलाठी म्हणून निवड झाली आहे. या तिघांनी यश संपादन केले असून ग्रामस्थांनी या तिघांची ढोल ताशांच्या गजरात मिरवणूक काढली. त्यांच्या आई- वडिलांचासुद्धा यावेळी सत्कार करण्यात आला. या तिघांनी गावातील तरुणपिढी समोर एक चांगला आदर्श निर्माण केला असल्याची भावना यावेळी व्यक्त करण्यात आली.

By kaysangtaa.21

पुणे, मुंबई, पिंपरी चिंचवड, सोलापूर व नगर येथे ‘पुढारी’, ‘प्रभात’ व ‘सकाळ’मध्ये बातमीदार व उपसंपादक म्हणून काम करत पत्रकारितेचा अनुभव घेतल्यानंतर 'काय सांगता' हे न्यूज पोर्टल सुरु करण्यात आले आहे. या पोर्टलवरील प्रत्येक बातमी विश्वसनीय असते. करमाळा येथील बातम्यांसाठी अशोक मुरूमकर संपर्क : ९९२३१७५०२४ कार्यालय पत्ता : डॉ. बाबासाहेब आंबेडकर शॉपिंग सेंटर, गाळा नं. ४७, पेट्रोल पंपाजवळ, जुनी भाजी मंडई, वरचा मजला करमाळा, जि. सोलापूर- ४१३२०३. मेल आयडी : kaysangtaa.21@gmail.com जाहिरातीसाठी संपर्क : ९९२३१७५०२४

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *