करमाळा (अशोक मुरूमकर) : यशवंतराव चव्हाण मुक्त वसाहत योजनेंतर्गत सोलापूर जिल्ह्यातील ४४१ वैयक्तिक घरकुल लाभार्थ्यांच्या प्रस्तावास इतर मागास बहुजन कल्याण विभागाने कार्योत्तर मान्यता व निधी उपलब्ध करून दिला आहे. याबाबत राज्य सरकारचे अवर सचिव एस. एस. यादव यांनी सरकार निर्णय जाहीर केला आहे.
सोलापूर जिल्ह्यातील अक्कलकोट, करमाळा, मंगळवेढा, माळशिरस, पंढरपूर, सांगोला, उत्तर सोलापूर, दक्षिण सोलापूर व माढा तालुक्यात ४४१ लाभार्थ्यांना घरकुले मंजूर झाली आहेत. बार्शी व मोहोळ तालुक्यासाठी एकही घरकुल मंजूर झालेले नाही. ४४१ घरकुलासाठी ५ कोटी ५० लाख ३६ हजार ८०० रुपये मंजूर झाले आहेत. प्रत्येक लाभार्थ्यांच्या घरकुलासाठी १ लाख २० हजार प्रमाणे निधी दिला जाणार आहे. मंजूर झालेल्या निधीपैकी १ कोटी १० लाख निधी वितरित केला जाणार असून उर्वरित निधी उपलब्ध आर्थिक तरतुदीनुसार दिला जाणार आहे.
हीच का रक्षाबंधनची भेट! बागल गटाला शेवटच्या ‘डीपीडीसी’ला सदस्यपद देऊन भाजपने काय साध्य केले?
विमुक्त जाती व भटक्या जमाती प्रवर्गातील घटकासाठी यशवंतराव चव्हाण मुक्त वसाहत घरकुल योजनेसाठी २०२० मध्ये जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हास्तरीय बैठक झाली होती. त्याला सरकारने प्रशासकीय मान्यता दिली आहे. २०२० मध्ये जिल्हास्तरीय समितीने पात्र ठरवलेल्या व छाननीत मंजूर झालेल्या घरकुलांना मान्यता देण्यात आली आहे, असे अप्पर सचिव अवर सचिव यादव यांनी म्हटले आहे.
करमाळा तालुक्यातील लिंबेवाडी, वांगी, वंजारवाडी, वडगाव, वडशिवणे, वरकटणे, वीट, शेलगाव वां, साडे, सालसे, सोगाव, सौदे, हिवरवाडी, हिसरे येथे घरकुल मंजूर झाले असल्याचे करमाळा पंचायत समितीचे गटविकास अधिकारी मनोज राऊत यांनी ‘काय सांगता’ न्यूज पोर्टलशी बोलताना सांगितले आहे.