-

करमाळा (अशोक मुरूमकर) : माढा लोकसभा मतदार संघात महायुतीचे उमेदवार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्याबाबत नाराजीचा सूर कायम असून ‘काय सांगता’ न्यूज पोर्टलने याबाबत वृत्त प्रसिद्ध केल्यानंतर एकापाठोपाठ एक नाराजीच्या घटना समोर येऊ लागल्या आहेत. निंबाळकरांच्या प्रचार यंत्रणेत त्रुटींचा अभाव असल्याचे बोलले जात असून काही ठराविक पदाधिकाऱ्यांचा हस्तपक्षेप असल्याची चर्चा आहे.

माढा लोकसभा मतदारसंघात ७ मे रोजी मतदान आहे. येथे महाविकास आघाडीचे धैर्यशील मोहिते पाटील व महायुतीचे खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्यात खरी लढत आहे. वंचित देखील येथे महत्वाची भूमिका बजावणार असल्याचे बोलले जात असून येथे प्रचाराने जोर घेतला आहे. मात्र भाजपमध्ये अजूनही नाराजी नाट्य असून याचा फटका निंबाळकरांना बसण्याची शक्यता आहे.

काही दिवसांपूर्वीच भाजप युवा मोर्चाचे चंद्रकांत राखुंडे यांनी गटबाजीला कंटाळून राजीनामा दिला. त्यानंतरही प्रचार यंत्रणेत सुधारणा झालेली दिसत नाही. भाजपचे शंभूराजे जगताप हे देखील प्रचारात अजूनही सक्रिय झालेले दिसत नाहीत. त्यांचीही नाराजी असल्याची चर्चा आहे. करमाळा भाजप महिला आघाडीही प्रचारात सक्रिय नसल्याचे दिसत आहे. विश्वसनीय सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार प्रचार यंत्रणेत योग्य समनव्य नसल्याचा हा परिणाम आहे. पदाधिकारी खासगीत नाराजी व्यक्त करत आहेत. मात्र नाव छापण्यास परवानगी देत नाहीत.

‘करमाळ्यात निंबाळकरांच्या सभेत रिकाम्या खुर्च्या! व्हिडिओ व्हायरल’ या मथळ्याखाली ‘काय सांगता’ न्यूज पोर्टलने वृत्त दिले होते. त्यांनतर एकामागून एक अशा नाराजीच्या घटना समोर येऊ लागल्या आहेत. प्रचारासाठी अजून प्रचार साहित्यही मिळाले नसल्याचे महिला आघाडीच्या एका पदाधिकाऱ्याने सांगितले आहे. वरिष्ठ पदाधिकारी फक्त प्रचाराला लागा असे सांगत आहेत मात्र महिलांना एकत्र कसे करायचे? प्रचाराची रणनीती कशी आखायची? कोणत्या मुद्द्यावर भर देईचा? शहरातील विकास कामे भाजपानी काय केली? हे कसे पटवून द्यायचे याची काहीही माहिती दिली जात नसल्याचे सांगत नाराजी व्यक्त केली आहे. या मतदारसंघात भाजपचा खासदार झाला पाहिजे अशी अपेक्षा आहे, मात्र यंत्रणा सक्षम करण्याची गरज असल्याचे सांगितले जात आहे.
करमाळ्यात निंबाळकरांच्या सभेत रिकाम्या खुर्च्या! व्हिडिओ व्हायरल
Madha Loksabha : अजूनही वेळ गेलेली नाही, निंबाळकरांनी सावध होण्याची आवश्यकता!

By kaysangtaa.21

पुणे, मुंबई, पिंपरी चिंचवड, सोलापूर व नगर येथे ‘पुढारी’, ‘प्रभात’ व ‘सकाळ’मध्ये बातमीदार व उपसंपादक म्हणून काम करत पत्रकारितेचा अनुभव घेतल्यानंतर 'काय सांगता' हे न्यूज पोर्टल सुरु करण्यात आले आहे. या पोर्टलवरील प्रत्येक बातमी विश्वसनीय असते. करमाळा येथील बातम्यांसाठी अशोक मुरूमकर संपर्क : ९९२३१७५०२४ कार्यालय पत्ता : डॉ. बाबासाहेब आंबेडकर शॉपिंग सेंटर, गाळा नं. ४७, पेट्रोल पंपाजवळ, जुनी भाजी मंडई, वरचा मजला करमाळा, जि. सोलापूर- ४१३२०३. मेल आयडी : kaysangtaa.21@gmail.com जाहिरातीसाठी संपर्क : ९९२३१७५०२४

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *