करमाळा (अशोक मुरूमकर) : तालुक्यातील १६ ग्रामपंचायतीच्या सरपंचपदाच्या निवडणुकीसाठी ४५ व सदस्यपदाच्या निवडणूकीसाठी ४०८ उमेदवार रिंगणात उतरले आहेत. यामध्ये उंदरगाव ग्रामपंचायत बिनविरोध झाली असून येथील 7 ग्रामपंचायत सदस्य व सरपंच बिनविरोध झाले आहेत. याशिवाय निंभोरे, कोर्टी एक, केत्तुर 5 व भगतवाडीचे दोन सदस्य बिनविरोध निवडले आहेत. प्रभारी तहसीलदार विजयकुमार जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली अर्ज मागे घेण्याची प्रक्रिया झाली. यावेळी अनुचित प्रकार घडू नये म्हणून पोलिस निरीक्षक ज्योतीराम गुंजवटे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलिस निरीक्षक प्रवीण साने यांनी बंदोबस्त ठेवला होता.
तालुक्यातील कावळवाडी ग्रामपंचायतीमध्ये 14, रामवाडी 14, भगतवाडी 10, राजुरी 23, चिखलठाण 26, गौंडरे 28, कंदर 45, कोर्टी 36, निंभोरे 24, केत्तुर 16, वीट 38, घोटी 33, रावगाव 22, केम 34, जेऊर 30 असे 408 उमेदवार सदस्यपदासाठी निवडणूक रिंगणात आहेत. तर सरपंचपदासाठी कावळवाडीत 2,
रामवाडी 2, भगतवाडी 2, राजुरी 2, चिखलठाण 2, गौंडरे 4, कंदर 5, कोर्टी 4, निंभोरे 3, केत्तुर 4, वीट 3, घोटी 3, रावगाव 3, केम 2, जेऊर 3 असे 45 उमेदवार रिंगणात आहेत.
बिनविरोध झालेले सदस्य
भगतवाडी : 2
उंदरगाव : 7
निंभोरे : 1
कोर्टी : 1
केत्तुर : 5
उंदरगाव : सरपंच