करमाळा (सोलापूर) : शहरातील खलील गुलाम मुलाणी (वय ४५) यांचे सोमवारी (ता. 23) हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन झाले आहे. त्यांच्या पश्चात पत्नी, एक मुलगा, एक मुलगी, आई, भाऊ व बहीण असा परिवार आहे. मुलाणी यांनी वडिलांच्या निधनानंतर प्रतिकूल परिस्थितीत कमी वयात कुटुंबाची जबाबदारी अंगावर घेऊन चिकन विक्रीचा व्यवसाय केला.
चिकन विक्रीच्या व्यवसायातून त्यांनी जिद्दीने कष्ट करत प्रगती केली होती. याच व्यवसायाच्या माध्यमातून त्यांनी मित्रांचा गोतावळा तयार करून प्रत्येक धर्मातील सामाजिक कार्यात सहभागी होऊन ते मुस्लीम समाजाबरोबर इतर समाजातही लोकप्रिय झाले होते. गरजू विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी, विधवा महिलांच्या मुलींच्या लग्नासाठी, आजारी व्यक्तींकरिता त्यांचा सदैव मदतीचा हात पुढे असायचा. त्यांचें हेच सामाजिक कार्याचे गुण बघुन सावंत गटाचे नेते सुनील सावंत व संजय सावंत यांनी करमाळा नगरपालिकेच्या निवडणुकीत प्रभाग क्रमांक एक मधुन त्यांना उमेदवारी दिली होती. त्यांचा अत्यंत कमी मतांने पराभव झाला होता. पैगंबरवासी खलील मुलाणी यांच्या निधनाने हळहळ व्यक्त होत आहे.