करमाळा (अशोक मुरुमकर) : श्री आदिनाथ सहकारी साखर कारखाना निवडणुकीमधून २०४ उमेदवारांनी माघार घेतली असून 62 उमेदवारांचे ६८ अर्ज रिंगणात आहेत. त्यामुळे काही ठिकाणी ही निवडणूक दुरंगी, तिरंगी तर काही ठिकाणी चौरंगी अशी ही लढत होणार आहे. आमदार नारायण पाटील, माजी आमदार संजयमामा शिंदे व प्रा. रामदास झोळ यांच्या पॅनलमध्ये हि लढत होत आहे.
विधानसभा निवडणुकीनंतर करमाळा तालुक्यात आदिनाथ सहकारी साखर कारखाना निवडणुकीच्या निमित्ताने माजी आमदार संजयमामा शिंदे व आमदार नारायण पाटील यांची प्रतिष्ठा पणाला लागणार आहे. या निवडणुकीसाठी 272 अर्ज आले होते. मात्र आता २०४ जणांनी घेतली आहे. साखर कारखाना निवडणुकीच्या रिंगणातून बागल गट व जगताप गटाने माघार घेतली होती. त्यामुळे ही निवडणूक कशी होणार याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. महायुती म्हणून शिंदे यांचे नेतृत्वाखाली पॅनल देण्यात आलेला आहे तर पाटील यांच्या नेतृत्वाखाली देखील एक पॅनल आहे
झोळ यांच्या नेतृत्वाखाली देखील तिसरा पॅनेल तयार करण्यात आलेला आहे.