करमाळा (सोलापूर) : वेताळ पेठमधील गजानन सोशल अँड स्पोर्ट्स क्लबच्या वतीने गणेश उत्सवानिमित्त शनिवारी (ता. ३०) रक्तदान व नेत्र तपासणी शिबिर होणार आहे, अशी माहिती गजानन सोशल अँड स्पोर्ट्स क्लबचे संस्थापक अध्यक्ष माजी नगराध्यक्ष प्रशांत ढाळे यांनी दिली आहे.
गजानन सोशल अँड स्पोर्ट्स क्लब धार्मिक कार्याबरोबरच सामाजिक उपक्रमात अग्रेसर राहून काम करत आहे. यंदा करमाळ्याच्या नागरिकांच्या आरोग्याची काळजी म्हणून मोफत रक्त तपासणी व रक्तदान शिबिर घेतले आहे. यामध्ये रक्तातील शुगर, HBA1C, KFT किडनी टेस्ट, LFT लिव्हर टेस्ट, cholesterol कोलेस्ट्रॉल, thyroid थायरॉईड लिपिड प्रोफाइलची तपासणी करण्यात येणार आहे. रक्तदात्यास गजानन सोशल अँड स्पोर्ट्स क्लबच्या वतीने भेट वस्तू देण्यात येणार आहे. नागरिकांनी याचा लाभ घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे.