On the occasion of Mahashivratri refreshments were distributed at Mahadev Mandir on behalf of BJP Mahila Aghadi

करमाळा (सोलापूर) : करमाळा शहर भाजपच्या महिला आघाडीच्या वतीने महादेव मंदिर किल्ला विभाग करमाळा येथे भाविकांसाठी फराळ वाटप करण्यात आले. या फराळ वाटपाची सुरवात सोलापूर जिल्हा नियोजन समिती सदस्य गणेश चिवटे यांच्या हस्ते करण्यात आली.

करमाळा शहरातील पुरातन काळातील ऐतिहासिक अशा महादेव मंदिरात महाशिवरात्रीनिमित्त मोठ्या संख्येने भाविक दर्शनासाठी येत असतात. या भाविकांना फराळ वाटप करण्यात आले. या कार्यक्रमाचे नियोजन भाजपा महिला आघाडी शहराध्यक्षा रेणुका राऊत यांनी केले. भाजपचे तालुकाध्यक्ष रामभाऊ ढाणे, शहराध्यक्ष जगदीश आगरवाल, शहर सरचिटणीस जितेश कटारिया, सोशल मीडिया संयोजक नितीन झिंजाडे, महिला आघाडीच्या ढोके उपस्थित होते.

By kaysangtaa.21

पुणे, मुंबई, पिंपरी चिंचवड, सोलापूर व नगर येथे ‘पुढारी’, ‘प्रभात’ व ‘सकाळ’मध्ये बातमीदार व उपसंपादक म्हणून काम करत पत्रकारितेचा अनुभव घेतल्यानंतर 'काय सांगता' हे न्यूज पोर्टल सुरु करण्यात आले आहे. या पोर्टलवरील प्रत्येक बातमी विश्वसनीय असते. करमाळा येथील बातम्यांसाठी अशोक मुरूमकर संपर्क : ९९२३१७५०२४ कार्यालय पत्ता : डॉ. बाबासाहेब आंबेडकर शॉपिंग सेंटर, गाळा नं. ४७, पेट्रोल पंपाजवळ, जुनी भाजी मंडई, वरचा मजला करमाळा, जि. सोलापूर- ४१३२०३. मेल आयडी : kaysangtaa.21@gmail.com जाहिरातीसाठी संपर्क : ९९२३१७५०२४

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *