खडकी, बिटरगाव श्री येथे पूरग्रस्त भागाची पालकमंत्र्यांकडून पहाणी

करमाळा (अशोक मुरूमकर) : करमाळा तालुक्यातील बिटरगाव श्री व खडकी येथे सीना नदीच्या पुरामुळे झालेल्या नुकसानीची पहाणी करून नुकसानीचे त्वरित पंचनामे करण्याचे आदेश देत सरकार पूर्णपणे शेतकऱ्यांच्या पाठीशी असल्याचे सांगत पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी शेतकऱ्यांना धीर दिला. पूरग्रस्त शेतकऱ्यांची व्यथा त्यांनी ऐकली.

करमाळा तालुक्यात नऊ पैकी सात महसुली मंडळात अतिवृष्टी झाली. सीना नदीला पूर आल्याने काठावरील खडकी, निलज, बोरगाव, तरटगाव, बिटरगाव (श्री), आळजापुर, बाळेवाडीमध्ये शेतीचे व पिकाचे मोठे नुकसान झाले आहे. खडकी येथील कोल्हापूर पद्धतीचा लघु पाटबंधारा फुटून शेतीचे मोठे नुकसान झाले आहे. तर तरटगाव बंधाऱ्यामुळे दोन्ही बाजूच्या शेतीचे नुकसान झाले आहे. पूरग्रस्त भागाची प्रत्यक्ष बांधावर जाऊन पालकमंत्री गोरे यांनी पाहणी केली. या नुकसानीचे पंचनामे प्रशासनाने त्वरित करून सरकारला अहवाल सादर करावा, असे आदेश त्यांनी अधिकाऱ्यांना दिले आहेत.

खडकी येथे पुराच्या पाण्याच्या प्रवाहाने फुटलेल्या बंधाऱ्याची पाहणी करून येथील नुकसानग्रस्त शेतकरी लोहार यांच्याकडून झालेल्या नुकसानीची माहिती घेतली. बंधाऱ्याचे दरवाजे बंद असल्याने दोन्ही बाजूचा भराव वाहून गेल्याने शेतकऱ्यांचे शेती पिके व मातीही खरडून वाहून गेली आहे. बिटरगाव श्री येथील रस्ता पुराच्या पाण्यामुळे वाहून गेल्याची पाहणी केली. अनेक महिला भगिनींनी पुरामुळे झालेल्या नुकसानीची माहिती दिली. जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संदीप कोहिनकर, प्रांताधिकारी जयश्री आव्हाड, तहसीलदार शिल्पा ठोकडे, उपविभागीय कृषी अधिकारी संजय वाकडे, तालुका कृषी अधिकारी राजेंद्र नेटके, सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अभियंता सुनिता पाटील यांच्यासह भाजपचे जिल्हा ग्रामीण अध्यक्ष चेतनसिंह केदार सावंत, गणेश चिवटे, शशिकांत पवार, जगदीश अग्रवाल, प्रा. रामदास झोळ, सूर्यकांत पाटील, कन्हैयालाल देवी, शिवसेना जिल्हा प्रमुख महेश चिवटे उपस्थित होते. राष्ट्रवादीचे संतोष वारे व अजिंक्य जाधव पाटील यांनी यावेळी निवेदने दिली.

खडकी येथे मैनाबाई लोखंडे, राणी लोखंडे, हरिभाऊ लोखंडे, प्रल्हाद लोखंडे, एकनाथ सुळ, आप्पा सुळ, कल्याण सूळ, शिवाजी सूळ, मोहन शिंदे, उपसरपंच भाऊसाहेब खरात, सरपंच उमाकांत बर्डे, माजी सरपंच बळीराम शिंदे, दिलीप सुळ, दादा विहाळे आदी उपस्थित होते. बिटरगाव श्री येथे भारत माने, आदिनाथ पाटील, माजी सरपंच डॉ. अभिजीत मुरूमकर, अशोकसर मुरूमकर, दौलत वाघमोडे, माजी उपसरपंच गणेश जाधव, युवराज देवकर, सचिन नलवडे, बापूराव मुरूमकर, विष्णू राजपूत, शिवाजी बोराडे, पोलिस पाटील भूषण अभिमन्यू, कैलास नलवडे, राम बोराडे, बबन दादा मुरूमकर, वसंत मुरूमकर आदी पदाधिकारी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *