Beating his wife with a cane saying that you do not behave according to my heartBeating his wife with a cane saying that you do not behave according to my heart

करमाळा (सोलापूर) : ‘तु माझ्या मनासारखे वागत नाही, तु मला मानपान देत नाही,’ असे म्हणत दारूच्या नशेत पतीने पत्नीला ऊसतोडायच्या कोयत्याने मारहाण केली आहे. यामध्ये जखमी पत्नीला करमाळा येथील एका खासगी रुग्णालयात दाखल केले आहे. करमाळा तालुक्यातील सालसे येथे हा प्रकार घडला आहे.

फिर्यादी विवाहित ३८ वर्षाची आहे. परांडा हे त्यांचे माहेर आहे. पती, पत्नी, मुलगा व मुलगी असे चौघेजण शेतात राहतात. १५ तारखेला दुपारी फिर्यादी व त्यांचा मुलगा हे माहेरावरून सासरी (सालसे) राहते घरी वस्तीवर आले. तेव्हा त्यांचा पती दारू पिलेला होता. सायंकाळी ६ वाजताच्या सुमारास गुन्हा दाखल झालेला संशयित पतीने पत्नीला शिवीगाळ सुरु केली. ‘तु माझ्या मनासारखे वागत नाही, तु मला मानपान देत नाही, तु नीट वाग नाही त जीवंत सोडणार नाही, असे म्हणत त्याने मारहाण केली. तेव्हा त्यांचा मुलगा कामानिमित्त नाशिक येथे गेला होता. रात्री साधारण साडेअकरा वाजता पतीने झोपेतून उठऊन मारहाण सुरु केली. ऊस तोडायच्या कोयत्याने मारहाण करून जखमी केले. तेव्हा त्यांना चुलत दिरांनी करमाळा येथील एका खासगी रुग्णालयात दाखल केले.

By kaysangtaa.21

पुणे, मुंबई, पिंपरी चिंचवड, सोलापूर व नगर येथे ‘पुढारी’, ‘प्रभात’ व ‘सकाळ’मध्ये बातमीदार व उपसंपादक म्हणून काम करत पत्रकारितेचा अनुभव घेतल्यानंतर 'काय सांगता' हे न्यूज पोर्टल सुरु करण्यात आले आहे. या पोर्टलवरील प्रत्येक बातमी विश्वसनीय असते. करमाळा येथील बातम्यांसाठी अशोक मुरूमकर संपर्क : ९९२३१७५०२४ कार्यालय पत्ता : डॉ. बाबासाहेब आंबेडकर शॉपिंग सेंटर, गाळा नं. ४७, पेट्रोल पंपाजवळ, जुनी भाजी मंडई, वरचा मजला करमाळा, जि. सोलापूर- ४१३२०३. मेल आयडी : kaysangtaa.21@gmail.com जाहिरातीसाठी संपर्क : ९९२३१७५०२४

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *