करमाळा (सोलापूर) : येथील विद्या विकास मंडळाच्या यशवंतराव चव्हाण महाविद्यालयामध्ये आज (गुरुवारी) 9 महाराष्ट्र बटालियन सोलापूरचे कर्नल राजा माजी यांनी सदिच्छा भेट दिली. यावेळी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एल. बी. पाटील, लेफ्टनंट डॉ. विजया गायकवाड, उपप्राचार्य कॅप्टन संभाजी किर्दाक व एनसीसी कॅडेटने गार्ड ऑफ ऑनर देऊन स्वागत केले.
यावेळी यशवंतराव चव्हाण महाविद्यालयात एनसीसी कॅडेटला मार्गदर्शन करताना 9 महाराष्ट्र बटालियन सोलापूरचे कर्नल राजा माजी म्हणाले की, ‘यशवंतराव चव्हाण महाविद्यालयातील अनेक कॅडेटची RDC व TSC कॅम्पसाठी निवड होत आहे. या महाविद्यालयात प्रत्येक कॅडेट प्रत्येक क्षेत्रामध्ये अतिशय चांगल्या पद्धतीने कामगिरी करतो व त्यांचा चांगला प्रतिसाद असतो. त्याचबरोबर महाविद्यालयातील कॅडेटचा रिझल्ट अतिशय चांगला आहे. हे महाविद्यालय भौतिक सुविधाने संपन्न आहे, असे गौरवउद्गार काढून महाविद्यालयातील कॅडेटचे व महाविद्यालयाचे कौतुक केले. यावेळी सुभेदार मेजर ग्यानबहादूर गुरुंग, ट्रेनिंग जे. सी. ओ बंडू गळवे, हवालदार मच्छिंद्र शेंद्रे, सीटीओ निलेश भुसारे आणि एनसीसी कॅडेट उपस्थित होते.