Fake collar Gujarat Connection A case has been registered against two shopkeepers in KarmalaFake collar Gujarat Connection A case has been registered against two shopkeepers in Karmala

करमाळा (सोलापूर) : बनावट रंग विक्री प्रकरणात दाखल असलेल्या गुन्ह्यातील दुसऱ्या संशयित आरोपीलाही करमाळा पोलिसांनी गुजरात येथून अटक केली आहे. एका कंपनीचा बनावट रंग ठेवून विक्री करत ग्राहकाची फसवणूक केल्याबद्दल करमाळा पोलिसात भारतीय दंड संहिता कलम 420, 34 सह कॉपीराईट कायदा 1957 कलम 63 व 65 प्रमाणे करमाळा शहरातील मंगळवार पेठ येथील दुकानदारासह दोघांविरुद्ध गुन्हा दाखल झाला होता.

या प्रकरणात दिल्ली येथील संबंधित कंपनीचे आनंद राधेश्याम प्रसाद (वय 27) यांनी फिर्याद दिली होती. त्यावरून दिनेश हुकुमचंद मुथा (रा. करमाळा) व योगेश फुलाणी (रा. गुजरात) या संशयितांविरुद्ध गुन्हा दाखल झाला होता. यामध्ये तीन लाख 36 हजार 1 रुपयाची फसवणूक झाली. यातील संबंधित बनावट रंगाचे डबे जप्त करून पोलिस गुजरात येथील संशयित आरोपीचा शोध घेत होते. संबंधित रंग हा गुन्हा दाखल झालेल्या दुकानदाराने गुजरातमधून घेतला होता. तेथील संशयित आरोपीला करमाळा पोलिसांनी ताब्यात घेऊन अटक केली आहे. गुन्हा दाखल होताच करमाळा पोलिसांचे पथक गुजरात येथे रवाना झाले होते.

या पथकात सहायक पोलिस निरीक्षक नेताजी बंडगर, पोलिस हवालदार अजित उबाळे व चेतन पाटील यांचा समावेश होता. पोलिस निरीक्षक ज्योतीराम गुंजवटे यांच्या मार्गदर्शनाखाली हा तपास सुरु आहे. गुजरात येथील संशयिताला नुकतीच अटक करण्यात आली आहे.

By kaysangtaa.21

पुणे, मुंबई, पिंपरी चिंचवड, सोलापूर व नगर येथे ‘पुढारी’, ‘प्रभात’ व ‘सकाळ’मध्ये बातमीदार व उपसंपादक म्हणून काम करत पत्रकारितेचा अनुभव घेतल्यानंतर 'काय सांगता' हे न्यूज पोर्टल सुरु करण्यात आले आहे. या पोर्टलवरील प्रत्येक बातमी विश्वसनीय असते. करमाळा येथील बातम्यांसाठी अशोक मुरूमकर संपर्क : ९९२३१७५०२४ कार्यालय पत्ता : डॉ. बाबासाहेब आंबेडकर शॉपिंग सेंटर, गाळा नं. ४७, पेट्रोल पंपाजवळ, जुनी भाजी मंडई, वरचा मजला करमाळा, जि. सोलापूर- ४१३२०३. मेल आयडी : kaysangtaa.21@gmail.com जाहिरातीसाठी संपर्क : ९९२३१७५०२४

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *